Wednesday, May 30, 2012

'वन हिट वंडर' - १ -> 'That Thing You Do'


१९९६ साली टॉम हॅन्क्सची निर्मिती असलेला एक चित्रपट आलेला, 'That Thing You Do' नावाचा. यात चार तरुणांच्या एका गटाची संगीत क्षेत्रातील सुरूवातीची मुसाफिरी फार सुंदररीत्या दाखवली होती. यामधील याच नावाचं गाणं मूळ अ‍ॅडम श्लेसिंगरने लिहीलं असून चित्रपटात या गाण्याची कथा "वंडर्स" नावाच्या ग्रूपच्या माध्यमातून दर्शवलेली आहे. त्यात होतं काय की मूळ बलाड् (Ballad ) स्वरूपात लिहिलेलं प्रेमगीत गाणं ऐन मोक्याच्या क्षणी ड्रमवादकाच्या द्रुत लयीतल्या ताल वादनाने रॉक गीतात परिवर्तीत होतं आणि जबरदस्त प्रसिद्ध होतं. अमेरिकन संगीत क्षेत्रात अगदी धुमाकूळ घालू लागतं. अमेरिकन संगीत दुनियेचं प्रगती पुस्तक मानलं जाणार्‍या बिलबोर्ड्स चार्टमध्ये येतं. नुसतंच येत नाही तर पुढची पुढची पायदानं चढत चढत शिखरावर पोहोचतंय की काय असं वाटण्याइतपत लोकप्रिय होतं. या गाण्यामुळे त्यांना नव्या ऑफर्स येऊ लागतात. टीव्हीवर  कार्यक्रमांमध्ये हे गाणं सादर करण्याची संधि मिळते. त्यांच्या गाण्यांचा अल्बम काढण्यासाठी मोठा संगीत निर्माता त्यांना ऑफर देतो. पण दरम्यान ग्रूपमधल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटतात नि परिणामी या "वंडर्स" ग्रूपमधल्या सभासदांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण होऊन तो फुटतो आणि 'वन हिट वंडर' ग्रूप बनतो.

'वन हिट वंडर' ही खास अमेरिकन संगीतामधली संज्ञा आहे. अमेरिकन म्हणा किंवा युरोपियन, या लोकांची एक विचित्र पद्धत आहे. यांना प्रत्येक गोष्ट मोजायची फार मोठी खोड आहे. गोष्ट नुसतीच मोजायची नाही तर त्या मोजमापाची रीतसर नोंदही करून ठेवायची. फारा वर्षांपासून केलेल्या असल्या काटेकोर नोंदी युरोपात वगैरे मिळतात. (भारतीयांना त्यांच्या १०% जरी अशी सवय असती तर मिपावरची मोठी बॅण्डविड्थ काथ्याकुटात फुकट गेली नसती ;-)) तसाच काहीसा प्रकार त्यांनी संगीतामध्येही केलेला आहे. तिथे एखाद्या गाण्याची लोकप्रियता मोजण्याची फुटपट्टी बिलबोर्ड टॉप १०० या यादीमधून बनते. या यादीमध्ये जे गाणं वरच्या क्रमांकावर ते गाणं तेवढं लोकप्रिय. आता या १०० गाण्यांच्या यादीमध्येही पुन्हा दुजाभाव करत शीर्षस्थ ४० आणि पादस्थ ६० अशी विभागणी केली जाते. सर्वसामान्यपणे या शीर्षस्थ ४० मध्ये एखादं गाणं आलं तरच ते 'हिट' मानण्याचा प्रघात आहे. या पद्धतीच्या 'हिट'च्या अनेक व्याख्या अनेकांनी आपापली बुद्धी खर्च करून मांडल्या आहेत पण इथे मात्र आपण वरचीच व्याख्या मानून पुढे जाणार आहोत. या अशा 'हिट' गाण्यांच्या नोंदी वर्षानुवर्ष बिलबोर्ड टॉप १०० हिट्स यादीमध्ये होत आहेत. या यादीमध्ये एखाद्या कलाकाराचं किंवा ग्रूपचं त्यांच्या सांगीतिक आयुष्यात केवळ एकच गाणं टॉप ४० मध्ये येऊन हिट झालं तर तो कलाकार वा ग्रूप आणि ते गाणं हे 'वन हिट वंडर' मानलं जातं. भौगोलिक दूरतेमुळे किंवा भाषिक कारणांनी सांगीतिक इतिहासात अनेक कलाकार आणि ग्रूप तथा त्यांची गाणी 'वन हिट वंडर्स' म्हणून गणली गेली आहेत पण प्रत्यक्षात ते व त्यांची गाणी खूपच लोकप्रिय झाली आहेत. म्हणजेच ही संकल्पना काही सर्वसमावेशक अशी म्हणता येणारच नाही. तरी आपण सध्या तशा काही गाण्यांचा आनंद घ्यावा असा विचार आहे.  

तर सुरूवात कुठून करावी? विषय जर 'That Thing You Do'चा निघालेला आहे आणि मला व्यक्तिशः हे गाणं आणि त्याच नावाचा चित्रपट दोन्ही आवडतात तर याच गाण्यापासून होऊन जाऊ द्या श्री गणेशा!




मूळ लिरिक्स -

You,
Doin' that thing you do, 
Breaking my heart into a million pieces,
Like you always do 
And you,
Don't mean to be cruel,
You never even knew about the heartache,
I've been going through 
Well I try and try to forget you girl,
But it's just so hard to do,
Every time you do that thing you do 

I,
Know all the games you play,
And I'm gonna find a way to let you know that,
You'll be mine someday 
'Cause we,
Could be happy can't you see,
If you'd only let me be the one to hold you,
And keep you here with me 
'Cause I try and try to forget you girl,
But it's just so hard to do,
Every time you do that thing you do

I don't ask a lot girl,
But I know one thing's for sure, 
It's the love I haven't got girl,
And I just can't take it anymore 

'Cause we,
Could be happy can't you see,
If you'd only let me be the one to hold you,
And keep you here with me 
Cause it hurts me so just to see you go,
Around with someone new,
And if I know you you're doin' that thing,
Every day just doin' that thing,
I can't take you doing that thing you do

Wednesday, May 23, 2012

गीतगुंजन - २५ -> She's Always A Woman

बिली जोएल' बद्दल बोलतच आहोत तर त्याचंच आणखी एक गाणं 'She's Always A Woman'.

बिलीविषयी महिला वर्गात प्रचंड संमिश्र भावना आहेत.

काहींना तो गायक म्हणून खूप आवडतो तर काही त्याला 'आऊट राईट' नापसंत करतात. ज्यांना बिली आवडत नाही त्यांना तो एन्टीफेमिनीस्ट वाटतो. 

त्याची 'एन्टीफेमिनीस्ट' प्रतिमा बहुतांशी या गाण्यामुळे झालेली आहे असं मानलं जातं पण प्रेमभंग झालेल्या कुणाही पुरुषाला विचारा, तो हे त्याचे स्वत:चेच विचार आहेत असं छातीठोकपणे सांगेल. पण  मूळात प्रश्न हा आहे की स्वत: बिली या गाण्याबद्दल काय  म्हणतो? मागे आपण  पाहिलं आहे की कलाकार बिलीला स्वत:ची संगीत कारकिर्द व्यवस्थित हाताळता आली नव्हती आणि परिणामी त्याने काही चुकीच्या करारांवर सह्या  केल्या होत्या. यामुळे त्याच्या कारकीर्दीवरच टांगती तलवार लटकत होती. या प्रसंगात त्याच्या साहाय्यासाठी आली त्याची त्यावेळची पत्नी, एलिझाबेथ. 

एलीझाबेथने बिलीच्या सांगीतिक  कारकीर्दीची सूत्र स्वत:च्या ताब्यात घेतली आणि तीच सर्व व्यवस्थापन बघू लागली. तिच्या कडक स्वभावामुळे आणि कोणत्याही कृतीपूर्वी तिचा योग्य तो अंदाज घेण्याच्या धूर्ततेमुळे संगीत-व्यवसायात लोक तिला वचकूनच राहू लागले. कित्येकांनी तिला 'अनफेमिनीन' मानले. अशा एलिझाबेथवर बिलीने मात्र एक सुरेख  प्रेमगीत रचले आणि ते म्हणजेच  'She's Always A Woman'.

बिलीने लिहिलेलं बलाड प्रकारचं हे एक प्रेमगीतच आहे. बिलीसाठी कोणताही करार करतानाचा एलिझाबेथचा धूर्तपणा तो आपल्या खास शब्दांमध्ये व्यक्त करतो. यांचं वर्णन बिली "wound with her eyes" किंवा  "steal like a thief" असं करतो पण त्याचवेळी तिची या विषयीची विजीगिषु वृत्ती तो  "never give in" या शब्दांत व्यक्त  क रतो. 'अनफेमिनीन' संबोधण्यात आलेल्या एलिजाबेथबद्दल मात्र  बिली "she's always a woman to me" असंच म्हणतो.

बिलीचं  'She's Always A Woman' एकदा ऐकाच.


आणि ते गीत असं आहे - 

She can kill with a smile
She can wound with her eyes
She can ruin your faith with her casual lies
And she only reveals what she wants you to see
She hides like a child,
But she's always a woman to me

She can lead you to love
She can take you or leave you
She can ask for the truth
But she'll never believe you
And she'll take what you give her, as long as it's free
Yeah, she steals like a thief
But she's always a woman to me

CHORUS:
Oh--she takes care of herself
She can wait if she wants
She's ahead of her time
Oh--and she never gives out
And she never gives in
She just changes her mind

And she'll promise you more
Than the Garden of Eden
Then she'll carelessly cut you
And laugh while you're bleedin'
But she'll bring out the best
And the worst you can be
Blame it all on yourself
Cause she's always a woman to me
--Mhmm--

Bridge

CHORUS:
Oh--she takes care of herself
She can wait if she wants
She's ahead of her time
Oh--and she never gives out
And she never gives in
She just changes her mind

She is frequently kind
And she's suddenly cruel
She can do as she pleases
She's nobody's fool
And she can't be convicted
She's earned her degree
And the most she will do
Is throw shadows at you
But she's always a woman to me
--Mhmm--

Monday, May 21, 2012

'डिस्को क्वीन' - डॉना समर


काल नेट वर फेरफटका मारताना अचानक बातमी वाचली, डॉना समरच्या मृत्यूची आणि मन भूतकाळात मागे गेलं, बर्‍यापैकी मागे, पार ८५-८६ सालामध्ये. तेव्हा अस्मादिक कुठेतरी पाचवी-सहावीमध्ये असतानाची गोष्ट.
आमचे बंधुराज आमच्याहून पाच वर्षांनी मोठे. त्यावेळेस ते कॉलेज-कुमार बनून त्यांचा सोनेरी काळ जगत होते नि आम्ही शाळेत स्वतःचं आयुष्य फरफटवत होतो. बंधुराजांचं संगीताशी फारसं देणं घेणं नव्हतं पण तो काळच असा होता की तेव्हाच्या प्रत्येक कॉलेजकुमारांना दोन सांगितीक आवडी नसतील तर त्यांना बहुदा सिरियसली घेतलं जात नसावं. त्यातली एक आवड होती गझलांची आणि दुसरी इंग्लिश डिस्को गाण्यांची.
आम्ही नुकतेच, "अभय आ। नमन कर।" म्हणत हिन्दी शिकत होतो त्यामुळे गझल ऐकताना कठीण शब्द घुसडलेली हिन्दी गाणी ऐकतोय असं वाटायचं. जे ऐकतोय ते काहीसं कळतंय पण वळत मात्र नाही आहे अशी भावना व्हायची पण ते दुसरं इंग्लिश डिस्को प्रकार काहीच कळायचा नाही. हां, पण त्या गाण्यांवर हात-पाय-कंबर हलवत लोकं नाचताना पाहिलेली आणि तसं नाचायचा प्रयत्न करताना जाम मजाही यायची. बाकी आमची नेहमीचीच इंग्लिश अज्ञतेची अडचण! असो. तर सांगत काय होतो की आमच्या बंधुराजांनी त्यावेळच्या नियमांना अनुसरून मित्राची एक कॅसेट कॉपी मारून आणली. त्यावेळच्या पॉप्युलर डिस्को गाण्यांची ती कॅसेट होती. एका दुपारी अस्मादिकांनी दुपारी कुणी नसताना ती कॅसेट लावली. त्यातलं पहिलं गाणं होतं, "She Worked Hard For The Money" आणि गायिका होती डॉना समर. गाण्याचे बोल काय आहेत ते काहीच कळलं नव्हतं पण त्यातले डिस्को बीट्समात्र तेव्हाही एकदम आवडून गेले होते. पहिल्यांदा ऐकल्यावर स्टॉप करून आणि रिवाईण्ड करून मी तेच गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं. सात-आठ वेळा तरी. या सगळ्याची इतिश्री रेकॉर्ड-प्लेयरशी खेळ करतोय असं वाटून आईच्या ओरडण्यात आणि थोडे फटके खाण्यात झाली. (बहुतेक तो ओरडा नि मार, त्या गाण्यातल्या डिस्को-बीट्सने दुपारी तिची झोप उडवल्याचाच तो परिणाम असावा.) नंतर अर्थातच हे गाणं कशाबद्दल आहे ते आमच्या बंधुराजांनाच विचारावं लागलं. तेव्हा त्याने सांगितलं की एक बाई आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करण्यासाठी किती कष्ट करून पैसे मिळवतेय हे त्या गाण्यात सांगितलंय.

खरं तर मी तेव्हा त्याच्यावर विश्वासच ठेवायला तयार नव्हतो. माझे कान तो पर्यंत केवळ भारतीय संगीतच ऐकत होते. आपल्याकडे करूण विषयावरची गाणी करूण स्वरांमध्येच असणार असंच गृहितक होतं पण हे गाणं तसं नव्हतं. या गाण्याची सुरावट मला तरी ऐकताना आनंदीच वाटली होती. त्यावेळीही मी फार वाद न घालता गप्प बसलो मात्र हे गाणं मनात रुंजी घालत होतंच. पुढे अनेक वर्षांनी भारतात एम् टिव्ही सुरू झाल्यावर एका दिवशी त्यातल्या 'एम् टिव्ही रिवाईण्ड' नावाच्या कार्यक्रमामध्ये अचानक या गाण्याचे चिरपरिचित सूर ऐकू आले आणि त्यावेळी पहिल्यांदा या गाण्याचा विडिओ बघायला मिळाला. त्यावेळपर्यंत माझं इंग्लिशही काहीसं सुधारलेलं आणि इंग्लिश गीतं समजूनही घेता येत होती.
या गाण्याच्या विडिओमध्ये एका स्त्रीची आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी केलेल्या धडपडीची कथा नीट दाखवलेली आहे. डॉनाने हे गाणं एका हॉटेलमध्ये भेटलेल्या हाऊसकीपिंग स्टाफच्या सत्य परिस्थितीवर लिहिलं होतं. हे लिहिताना तिला मायकल ओमार्टियनने मदत केली होती. गाण्यातल्या नायिकेला डान्सर व्हायचं होतं पण त्याऐवजी तिला पडेल ती कामं करून आपल्या मुलांसाठी पैसे मिळवावे लागतात. पण तिच्या कष्टांची तिच्या मुलांनाही किंमत नसते. विडिओत शेवटी रिकाम्या रस्त्यावर डान्स करताना वेगवेगळ्या गणवेशातल्या मुली दाखवल्यात ज्यांच्यात विडिओतली नायिकाही असते. आपल्या कुटूंबासाठी स्वतःची आवड बाजूला ठेवून पैसा कमवण्यासाठी मिळेल तो रोजगार पत्करणार्‍या मुलींचेच ते द्योतक बनते. अशा मुलींना त्यांच्या कष्टांबद्दल आणि त्यांच्या त्यागाबद्दल योग्य तो मान मिळावा असंच डॉना सांगतेय.
डिस्को संगीतामध्ये नुसताच धिंगाणा न करता काही सामाजिक तथ्यांची व्यवस्थित मांडणी करून त्यांची लोकांना योग्य दखल घेणं देखिल करता येऊ शकतं हे मला या गीतामधून समजलं. मग डॉनाची "Love To Love You, Baby", "No More Tears", "Hot Stuff", "I Feel Love" आणि "MacArthur Park" वगैरे गाणी पुन्हा एकदा ऐकली नि मी डॉना समर्सचा पुन्हा एकदा फॅन झालो. तिची गायकी भन्नाट होती आणि तिने डिस्कोच नाही तर पुढे रॉक, पॉप, न्यू वे म्युझिक इ. निरनिराळ्या प्रकारच्या संगीतामध्ये गाणी बनवली आणि गायली.
'डिस्को क्वीन' म्हणून ओळखल्या जाणार्‍या, सहा वेळा अमेरिकन म्युझिक अ‍ॅवॉर्ड आणि पाच वेळा ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स जिंकणार्‍या नि माझ्या आवडत्या 'डॉना समर्स'ची मित्रांना थोडक्यात ओळख करून देण्याचा माझा एक प्रयत्न.
ईश्वर डॉनाला त्याच्या चरणी जागा देवो हीच प्रार्थना!
डॉना समरचं "She Worked Hard For The Money" हे गीत -
She works hard for the money. So hard for it, honey.
She works hard for the money. So you better treat her right.

Onetta here in the corner stand and wonders where she is.
And it's strange to her, some people seem to have everything.
9 am on the hour hand and she's waiting for the bell.
And she's looking real pretty. She's waiting for her clientele.

She works hard for the money. So hard for it, honey.
She works hard for the money. So you better treat her right.

Twentyeight years have come and gone.
And she's seen a lot of tears
of the ones who come in. They really seem to need her there.
It's a sacrifice working day to day. For little money just tips for pay.
But it's worth it all just to hear them say that they care.

She works hard for the money. So hard for it, honey.
She works hard for the money. So you better treat her right.

She already knows she's seen her bad times.
She already knows these are the good times.
She'll never sell out, she never will, not for a dollar bill.
She works haaaaard.........

Sax Solo
Git Solo

She works hard for the money. So hard for it, honey.
She works hard for the money. So you better treat her right.