Wednesday, December 28, 2011

गीतगुंजन १६ - 'My Heart Is Beating' -> Preeti Sagar

भारतातही डीसेंट इंग्लिश गाण्यांची कमी नाही आणि मला ताबडतोब आठवणारं पहिलं भारतीय इंग्लिश गाणं प्रीति सागरचं "My Heart is beating" हे होतं. विचार केला यावर लिहावं.

१९७५ साली चित्रपट आला 'ज्युली'. एका एंग्लो-इंडियन कुटुंबाची कहाणी सांगणारा हा सिनेमा. स्वत:ला इतर भारतीय समाजापेक्षा वेगळ समजणारं, उच्च समजणारं, बदलत्या सामाजिक परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेऊ इच्छिणारं असं हे कुटुंब आणि त्यातली ही ज्युली, सर्वात थोरली. इंग्लिश एटिकेट्स जपणारे कुटुंबीय जेवणानंतर ज्युलीला गाण्याचा आग्रह करतात आणि तेव्हा ती हे गाणं प्रिती सागरच्या आवाजात गाते.

तारुण्याच्या उम्भरठ्यावर असलेली ज्युली शिकत असते, बाहेरच्या जगात, समाजात फिरत असते. तिच्यात तिच्या पालकांचा विशेषत: तिच्या आईचा 'कूपमंडूक'पणा आणि स्वत:ला इतरांपेक्षा निराळ समजण्याचा दृष्टीकोन नसतो. या गाण्यात तिचे तिच्या वयाला आणि काळाला साजेसे विचार फार आनंद देतात. ज्युली चित्रपटाचे गीतकार 'आनद बक्षी' आहेत पण मला नक्की कल्पना नाही की या गाण्याचे नेमके गीतकार कोण आहे. संगीतकार आहेत राजेश रोशन....

गाणं अप्रतिम आहे आणि माझ्या मते इथे स्थान मिळण्यासाठी योग्य आहे.

जरूर आनद घ्या....


आणि हे 'My Heart Is Beating' गीत


My heart is beating, keeps on repeating 
I' m waiting for you - 2 
 
My love encloses a plot of roses 
And when shall be then our next meeting 
Cause love you know 
That time is fleeting, time is fleeting 
Time is fleeting 

My heart is beating, keeps on repeating 
I' m waiting for you
 
My love encloses a plot of roses 
And when shall be then our next meeting 
Cause love you know 
That time is fleeting, time is fleeting 
Time is fleeting 

Oh when I look at you 
The blue of heaven seems to be deeper blue 
And I can swear that 
God himself seems to be looking through 
Zu zu zu zu ru zu, I' ll never part from you 
And when shall be then our next meeting With love you know 
That time is fleeting, time is fleeting 
Time is fleeting 

Spring is the season 
That drops the reason of lovers who are truly true 
Young birds are mating 
While I am waiting, waiting for you 
Darling you haunt me, say do you want me 
And if it is so, when are we meeting 
Cause love you know 
That time is fleeting, time is fleeting 
Time is fleeting 
  
My heart is beating, keeps on repeating 
I' m waiting for you 
My love encloses a plot of roses 
And when shall be then our next meeting 
Cause love you know 
That time is fleeting, time is fleeting 
Time is fleeting

Monday, December 26, 2011

गीतगुंजन - १५ : 'Thriller' -> Michael Jackson

मागच्या एका धाग्यामध्ये ऐंशीच्या दशकात पाश्चात्य संगीतामध्ये अवतरलेल्या मायकल जॅक्सन नावाच्या गारुडाचा उल्लेख आलेला होता. भारतामध्ये संगीतात विशेष प्राविण्य दाखवलेल्या व्यक्तीला गंधर्व किंवा गंधर्वाचा अवतार समजलं जातं. मायकलही एक असाच गंधर्व होता पण काहीसा शापित गंधर्व! प्रचंड हरहुन्नरी आणि जाणकार संगीतकार. त्याचा जन्मच संगीतावर प्रेम करणार्‍या कुटुंबात झालेला. त्याचे मोठे भाऊ नि बहिण सगळेच संगीताचे जाणकार तसेच वडिलही. पण हे वडिल नको इतक्या कडक शिस्तीचे असल्याने मायकलचे बालपण फार आनंदात गेले नाही.
 
सुरूवातीला मायकलने आपल्या मोठ्या भावांबरोबर सांगीतिक कार्यक्रमात भाग घेणे चालू केले. त्यांचा जॅक्सन ५ नावाचा ग्रूप खूप प्रसिद्ध झाला. वयाने सगळ्यात लहान असूनही जॅक्सन ५ चा मायकेल म्होरक्या गायक (लीड सिंगर) बनला. त्याची लोकप्रियता चिकार वाढली. तरी त्याच्या वडिलांचा कडक शिस्तीचा बडगा कमी झाला नाही. प्रसंगी लहानग्या मायकलवर हात उचलायलाही ते कमी करत नसत. मायकलच्या वाढत्या वयात या गोष्टीचा त्याच्या मनावर खूप परिणाम झाला असं तो सांगायचा पण अर्थात वडिलांच्या कडक शिस्तीतल्या रियाजामुळेच पुढे त्याला संगीतामध्ये अभूतपूर्व यश मिळवता आलं हेही तो नमूद करायचा. 

तो सज्ञान झाल्यावर त्याने जॅक्सन ५ हा भावांचा ग्रूप सोडून वैयक्तिक एकल गायनाला सुरूवात केली. ऐंशीच्या दशकापासून त्याने एकाहून एक सरस गाणी द्यायला सुरूवात केली आणि लवकरच तो 'किंग ऑफ पॉप' म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने पाश्चात्य संगीतात, विशेषतः पॉप संगीतात अनेक प्रयोग केले. त्याच्या आवडत्या संगीताला बॅले, कॉयर, आर् अ‍ॅण्ड बी, रॅप, जॅझ, ब्लूज् आणि डिस्को अशा विविधांगी संगीताची जोड देऊन नवी फंकी स्टाईल बनवली. त्याचप्रमाणे या सगळ्यावर कडी केली ती त्याच्या अप्रतिम नृत्य शैलीने! नाचणार्‍या आणि न नाचणार्‍यालाही आपल्या तालावर थिरकवायची नृत्यशैली! त्याच्या टिपेच्या अवाजातली गायकी, त्याची जबरदस्त नृत्यशैली, त्याची साध्या साध्या आणि कोणालाही समजतील अशा शब्दांची गाणी आणि त्याचं त्या गाण्यांचं सादरीकरण या सार्‍यांचा परिणाम त्याची 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा बनण्यात झाली. केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते निर्माण झाले. 

मायकल जॅक्सन एक उत्तम कलाकार होता आणि त्याचवेळेला एक हुशार प्रेझेन्टर होता. त्याचं संगीत कसं सादर व्हावं याचा तो खूप बारकाईने विचार करायचा. त्याने स्वतः त्याच्या गाण्यांचे विडिओ बनवण्याचे कष्ट घेतल्याने ते आजही तितकेच नाविण्यपूर्ण वाटतात. 

१९८२ साली त्याने गायलेल्या एका गाण्यामध्ये मायकलचे सगळे गुण प्रकर्षाने उठून दिसतात आणि एखादा कलाकार आपली कला लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावी म्हणून किती कष्ट घेऊ शकतो आणि प्रत्येक गोष्टीचा किती सूक्ष्म विचार करून ती सादर करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून या गाण्याकडे पाहता येतं. हे गाणं आहे, 'Thriller'. 

रॉड टेंपर्टनने लिहिलेल्या आणि संगीत दिलेल्या या गाण्याची निर्मिती क्विन्सी जोन्सची होती आणि सादरकर्ता गायक होता मायकल जॅक्सन. त्याच्या याच नावाच्या अल्बममधलं हे शेवटचं गाणं होतं.
सुरूवातीला हे गाणं 'स्टारलाईट' नावानं ओळखलं जायचं पण क्विन्सीने रॉडला नवं नाव सुचवायला सांगितलं आणि त्याने सुचवलं 'थ्रिलर', ज्या नावाने पुढे पूर्ण अल्बमच ओळखला गेला. 

'Thriller'चं गीत एखादी भयकथा वाचावी असंच होतं आणि त्यातलं संगीतही अगदी त्याला साजेसं. यात दरवाजा बंद व्हायचे आवाज होते, वादळी वार्‍याचे आवाज होते, लाकडी पृष्ठभागावर बूट घालून चालल्यावर येणारे टॉक टॉक असे आवाज होते, कुत्र्याच्या रडण्याचे आणि अगदी खिडक्यांची तावदानं फुटण्याचेही आवाज होते. या गाण्याला सुरूवातीपासून शेवटपर्यंत सिंथसायझरवर एक बॅसलाईन दिलेली आहे. ही बॅसलाईन गाण्याबरोबर आपला सतत पाठलाग करते. त्यावर मायकल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात गाणं सादर करतो. 'Thriller'मध्ये हे जितकं उत्तम सादर झालंय तितकंच उत्तम झालंय १९४० - ५० च्या दशकातल्या, आपल्या भारदस्त आणि कमावलेल्या आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या विन्सेन्ट प्राईस या नटाच्या आवाजातलं नॅरेशन. ते देखिल एखादं गद्य-गानच असावं असंच ऐकू येतं आणि या सॉलिड गाण्याची परिणामकारकता जास्तच वाढवतं. 

एखाद्या भयकथेमध्ये जे जे काही अपेक्षित असतं ते सर्व या गाण्यात आणि त्याच्या संगीतात उपलब्ध होतं आणि ते मस्त होतं पण या सगळ्यावर कडी केली ती मायकल आणि जॉन लेंडिस यांनी बनवलेल्या 'Thriller'च्या म्युझिक विडिओने.

सुमारे दहा लाखभर बजेटच्या या विडिओला 'Michael Jackson's Thriller Movie' असंच नाव दिलं गेलं. मूळ गाण्यापेक्षा हा चित्रपट दुप्पट लांबीचा होता. लेंडिस आणि मायकलने मिळून याची पटकथा लिहिली आणि दिग्दर्शन लेंडिसने केलं. यात मायकल स्वतः प्रमुख भूमिकेत होता आणि ओला रे ही त्याची नायिका होती. भयपट बघणारे मायकल आणि ओला, तो चित्रपट अर्धवट सोडून बाहेर पडतात आणि रात्रीच्या सुनसान रस्त्यावरून जाताना कबरीतून बाहेर पडलेल्या झाँबींच्या तावडीत सापडतात. या विडिओचं वर्णन करण्यापेक्षा तो प्रत्यक्ष बघणंच केव्हाही उत्तम! तेव्हा आनंद घ्या, मायकल जॅक्सनच्या 'Thriller' गाण्याचा आणि त्याचबरोबर त्याच्या 'Michael Jackson's Thriller' या विडिओचाही. 


'Thriller' वर पुरस्कारांची बरसात झाली. २०११ सालच्या जुलैत 'टाईम मॅगझिन'ने 'Michael Jackson's Thriller' या विडिओचा समावेश जगातल्या सर्वोत्तम ३० विडिओंमध्ये केला.

हे 'Thriller' गीत - 
Michael: 
It's close to midnight and something evil's lurking in the dark
Under the moonlight, you see a sight that almost stops your heart
You try to scream but terror takes the sound before you make it
You start to freeze as horror looks you right between the eyes
You're paralyzed

You hear the door slam and realize there's nowhere left to run
You feel the cold hand and wonder if you'll ever see the sun
You close your eyes and hope that this is just imagination, girl!
But all the while you hear the creature creeping up behind
You're out of time

They're out to get you, there's demons closing in on every side
They will possess you unless you change that number on your dial
Now is the time for you and I to cuddle close together, yeah
All through the night I'll save you from the terror on the screen
I'll make you see

That this is thriller, thriller night
'Cause I can thrill you more than any ghost would ever dare try
Thriller, thriller night
So let me hold you tight and share a
Killer, diller, chiller, thriller here tonight

'Cause this is thriller, thriller night
Girl, I can thrill you more than any ghost would ever dare try
Thriller, thriller night
So let me hold you tight and share a killer, thriller, ow!

(I'm gonna thrill ya tonight)

Vincent Price:
Darkness falls across the land
The midnight hour is close at hand
Creatures crawl in search of blood
To terrorize y'alls neighborhood

And Whosoever Shall Be Found
Without The Soul For Getting Down
Must Stand And Face The Hounds Of Hell
And Rot Inside A Corpse's Shell

The foulest stench is in the air
The funk of forty thousand years
And grizzly ghouls from every tomb
Are closing in to seal your doom

And though you fight to stay alive
Your body starts to shiver
For no mere mortal can resist
The evil of the thriller

Michael:
That this is thriller, thriller night
'Cause I can thrill you more than any ghost would ever dare try
Thriller, thriller night
So let me hold you tight and share a
Killer, diller, chiller, thriller here tonight

'Cause this is thriller, thriller night
Girl, I can thrill you more than any ghost would ever dare try
Thriller, thriller night
So let me hold you tight and share a killer, thriller, ow!

Sunday, December 25, 2011

गीतगुंजन - १४ : "You Are Not Alone" -> MJ

"You Are Not Alone" ->मायकल जॅक्सन


'एमजे'चं आणखी एक अप्रतिम गाणं म्हणजे "You are not alone".

हे गाणं 'मायकल'च्या नेहमीच्या पठडी मधलं नाही तर ते एक शांत आणि हळूवार असं प्रेमगीत आहे. जीवनातील संकटांना आणि अडचणींना सामोरे जाताना आपल्याला मिळणार्‍या आवश्यक त्या व्यक्तींच्या साथीची यात महती गायली आहे.

'रोबर्ट केली'ने लिहिलेल्या गाण्याला 'एमजे'ने आपल्या गायकीने आणि अदाकारीने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. या गाण्याचं 'केली'चं संगीतही त्याने सुधारलं. गाण्याच्या शेवटाला 'एमजे'ने एक सुंदर 'कोयर' पीस जोडला आणि गाण्याची परिणामकारकता अनेक पटींनी वाढली.

या गाण्यातील किंवा या गाण्याच्या विडिओ मधील म्हणण जास्त संयुक्तिक होईल, 'एमजे' नि त्याची तत्कालीन पत्नी 'लिसा-मरी प्रिस्ले' यांची दृश्यं डीसेन्सीच्या व्याख्येत बसत नाहीत आणि ती तिथे अगदी निरर्थक आहेत हे देखील सहज समजून येतं. कदाचित एरवी एकटेपणा अनुभवणार्‍या 'मायकल'ला तेव्हा 'लिसा-मरी'ची साथ मिळत होती हे दर्शवायचं असावं पण ते सगळच अनावश्यक होतं हे नक्की.

तरी इतकी एक गोष्ट वजा करता, हे गाणं सर्वांना आवडेल याची खात्री आहे.

हे गाणं एन्ट्रीलाच बिलबोर्ड काउन्ट डाऊन च्या १ ल्या क्रमांकावर आलं आणि तसं येणारं ते एकमेव गाणं आहे. त्याबद्दलचा 'गिनीज बुक रेकोर्ड' या गाण्याच्या नावावर आहे.


एमजेचं You Are Not Alone हे गाणं असं आहे -

Another day has gone
I'm still all alone
How could this be
You're not here with me
You never said goodbye
Someone tell me why
Did you have to go
And leave my world so cold

Everyday I sit and ask myself
How did love slip away
Something whispers in my ear and says
That you are not alone
I am here with you
Though you're far away
I am here to stay

But you are not alone
I am here with you
Though we're far apart
You're always in my heart
But you are not alone

'Lone, 'lone
Why, 'lone

Just the other night
I thought I heard you cry
Asking me to come
And hold you in my arms
I can hear your prayers
Your burdens I will bear
But first I need your hand
Then forever can begin

Everyday I sit and ask myself
How did love slip away
Something whispers in my ear and says
That you are not alone
I am here with you
Though you're far away
I am here to stay

you are not alone
I am here with you
Though we're far apart
You're always in my heart
you are not alone

Whisper three words and I'll come runnin'
And girl you know that I'll be there
I'll be there

You are not alone
I am here with you
Though you're far away
I am here to stay
you are not alone
I am here with you
Though we're far apart
You're always in my heart

you are not alone
I am here with you
Though you're far away
I am here to stay

you are not alone
I am here with you
Though we're far apart
You're always in my heart

For you are not alone...
Not alone ohh
You are not alone
You are not alone
Say it again
You are not alone
You are not alone
Not alone, Not alone
If you just reach out for me girl
In the morning, in the evening
Not alone, not alone
You and me not alone
Oh together together
Not not being alone
Not not being alone

Saturday, December 24, 2011

गीतगुंजन - १३ : Wah Wah Song

गीतगुंजन - १३ : Wah Wah Song -> Georg Harrison

६० च्या दशकाच्या उत्तरार्धात बीटल जॉर्ज हॅरिसन स्वतःच गाणी लिहू लागला होता. त्यापूर्वीची बीटल्सची गाणी बहुदा जॉन लेनन आणि पॉल मकार्टनीच लिहायचे. अर्थात त्यांच्यातल्या नियमाप्रमाणे नेहमीच गीतकार म्हणून दोघांची नावं दिलेली असायची. या काळापर्यंत बीटल्स, सभासदांमध्ये एक घट्ट नातं असलेला ग्रूप होता. पण यापुढे ही नात्याची वीण हळू हळू सैल होऊ लागली. सुरुवात रिंगोच्या काही काळ ग्रूप सोडण्याने झालेली पण त्यात लगेचच दिलजमाई झाली आणि तो परतला. पुढला नंबर जॉर्जचा होता. जॉन आणि पॉल बरोबरच्या सततच्या वादावादीने जॉर्ज तत्कालीन इतर सांगीतिक सहकार्‍यांच्या बरोबर जास्त काळ घालवू लागला. बॉब डिलन, फ्रँक सिनात्रा, एरिक क्लॅप्टन असे अनेक बीटल्सबाह्य मित्र त्याने जोडले. त्यांच्या सान्निध्यात तो स्वतःच्या रचना लिहू लागला. पण त्याच्या सर्व रचना बीटल्स आपल्या म्युझिक अल्बम मध्ये घेण्यास नाखुशीच दर्शवत, विशेषतः जॉन आणि पॉल.

'गेट बॅक' या अल्बमच्या वेळी पॉलशी झालेल्या भांडणामुळे काही काळासाठी बीटल्समधून बाहेर पडलेल्या जॉर्जने लिहिलं एक भन्नाट गाणं. त्याचं नाव होतं Wah Wah Song. हे त्याच्या All Things Must Pass नावाच्या अल्बममध्ये त्याने घेतले आहे.

Wah Wah हे शब्द जॉर्ज कोणाला उद्देशून लिहितो यावर असंख्य मतं व्यक्त झालेली आहेत. काहींच्या मते तो डोकेदुखी दर्शवणारा शब्द आहे जी जॉर्ज त्यांच्या 'अ‍ॅपल रेकॉर्ड्स्'च्या कामामुळे उत्पन्न झाल्याचे दर्शवतोय तर काहींच्या मते तो हे शब्द पॉलला उद्देशून म्हणतोय तर काही या शब्दांचा संबंध अगदी 'ब्रह्मं सत्यं...'वाल्या मायेशी जोडतात. आपल्याला खरंतर याच्याशी जराही सोयर-सुतक नाही. आपला इंटरेस्ट आहे ते गाणं, त्याचं संगीत आणि गायकी यांच्याशी. त्यातला जॉर्जचा आवाज, त्याची गिटार, त्याला एरिक क्लॅप्टनची साथ, गॅरी ब्रूकरचा पियानो, बॉबी व्हिटलॉकचा इलेक्ट्रिक पियानो आणि बिली प्रेस्टनचा ऑर्गन, आपण केवळ त्याचाच आनंद घेऊ या.

जॉर्जचं Wah Wah Song एकदा ऐकाच. हा विडिओ जॉर्जच्या 'कॉन्सर्ट फॉर बांगलादेश'च्या वेळचा आहे.


जॉर्जच्या पहिल्या स्मृतिदिनी त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन त्याला श्रद्धांजली देण्यासाठी 'कॉन्सर्ट फॉर जॉर्ज' हा कार्यक्रम रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादर केला होता. तेव्हा हेच गाणं जेफ लेनी आणि एरिक क्लॅप्टननं भन्नाट म्हंटलेलं. हा पुढचा त्याचाही विडिओ जरूर बघा. या विडिओमध्ये जॉर्जचा एकुलता एक मुलगा धनी (इंग्लिश उच्चार धानी) गाण्यात बॅकिंग व्होकल आणि गिटारवर साथ करताना दिसतो.


हे Wah Wah Song -
Wah-wah
Youve given me a wah-wah
And Im thinking of you
And all the things that we used to do
Wah-wah, wah-wah

Wah-wah
You made me such a big star
Being there at the right time
Cheaper than a dime
Wah-wah, youve given me your wah-wah, wah-wah

Oh, you don't see me crying
Oh, you don't hear me sighing

Wah-wah
I don't need no wah-wah
And I know how sweet life can be
If I keep myself free from the wah-wah
I don't need no wah-wah

Oh, you don't see me crying
Hey baby, you don't hear me sighing
Oh, no no-no no

Wah-wah
Now I don't need no wah-wahs
And I know how sweet life can be
If I keep myself free - of wah-wah
I don't need no wah-wah

Wah-wah (repeat and fade)

Tuesday, December 20, 2011

गीतगुंजन - १२

गीतगुंजन - १२ : "Something"

१९६९ साली बीटल्स आपला 'अ‍ॅबे रोड' हा अल्बम बनवत होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच मन लावून जॉर्ज हॅरिसनच्या एका गाण्यावर काम करायला सुरुवात केली. पॉल आणि जॉन दोघांच्याही मते जॉर्जचं ते सर्वात चांगलं गाणं होतं. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन या दोहोंच्या अनुषंगाने! त्यांच्या या पूर्वीच्या 'लेट इट बी' अल्बमच्या ध्वनिमुद्रणादरम्यान जॉर्ज एकटाच बाजूच्या एका रिकाम्या स्टुडीओमध्ये गेला आणि त्याने या गीताचे बोल लिहिले. या गाण्याचं संगीत तयार होईपर्यंत 'लेट इट बी' अल्बम तयार झालेला. मग हे गाणं बीटल्सच्या पुढच्या 'अ‍ॅबे रोड' मध्ये घेतलं गेलं. बीटल्सचा सदस्य असताना अमेरीकन बिलबोर्ड चार्ट्मध्ये पहिल्या क्रमांकावर गेलेलं जॉर्जचं हे पहिलंच गाणं.

या गाण्यात जॉर्ज मुख्य गायक आहे आणि त्याला पॉलने साथ केलीय. लीड गिटारवर स्वतः जॉर्ज तर बेस गिटारवर पॉल आहे. ड्रम्सवर रिंगो आहे. जॉनचा पियानो सुरुवातीला आणि मध्ये ऐकता येतो. पण गाण्यात झकास रंग भरतो काळा बीटल अर्थात बिली प्रेस्टन आणि त्याचा ऑर्गन! त्याबरोबरच जॉर्ज मार्टीनची तन्तुवाद्यांची अरेन्जमेण्ट गाण्याला एका वेगळ्याच पातळीवर नेते.

या गाण्याबरोबर प्रदर्शित झालेला विडिओही स्पेशल आहे. यात जॉर्ज (पॅटी), पॉल (लिण्डा), जॉन (योको) आणि रिंगो (मॉरीन) आपापल्या पत्नींसोबत दिसतात. (अर्थात याच दरम्यान बीटल्सच्या सदस्यांमध्ये वाद सुरू असल्याने प्रत्येकाचं वेगवेगळं चित्रिकरण करून एकत्र जोडलं आहे.)

जॉर्जच्या या गाण्याची सर्वाधिक कव्हर व्हर्जन्स गायली गेलेली आहेत. एल्व्हीस प्रीस्ले, फ्रँक सिनात्रा, शर्ली बॅसी, जेम्स ब्राऊन, एरिक क्लॅप्टन अशा अनेक धुरंधरांची यामध्ये गणना होते. फ्रँक सिनात्रा या गाण्याची "आत्तापर्यंत लिहिलेलं सर्वोत्तम प्रेमगीत" अशी स्तुती करतो.

राग, द्वेष आणि मत्सराने वेढलेल्या आजच्या काळात या अस्सल प्रेमगीताचा आनंद घ्या.....


तर हे असं आहे आजपर्यंतचं सर्वोत्तम प्रेमगीत - "Something"

Something in the way she moves,
Attracts me like no other lover.
Something in the way she woos me.
I don't want to leave her now,
You know I believe and how.

Somewhere in her smile she knows,
That I don't need no other lover.
Something in her style that shows me.
I don't want to leave her now,
You know I believe and how.

You're asking me will my love grow,
I don't know, I don't know.
Stick around, and it may show,
But I don't know, I don't know.

Something in the way she knows,
And all I have to do is think of her.
Something in the things she shows me.
I don't want to leave her now.
You know I believe and how.

Saturday, December 17, 2011

गीतगुंजन - ११

गीतगुंजन - ११ : "Come On Eileen"

ऐशीचं दशक हे सर्वार्थानं पॉप संगीताचं दशक मानलं जातं. या काळात इतर प्रकारचं संगीत निर्माणच झालं नाही असं नाही पण यासाठी की हा काळ 'किंग ऑफ पॉप' हे बिरुद मिळालेल्या 'मायकल जॅक्सन'चा होता. आज पॉप संगीतच काय पण कोणत्याही प्रकारचं पाश्चात्य संगीत न आवडणार्‍या माणसालाही 'मायकल जॅक्सन' हे नाव माहिती असतं. या दशकात एका पाठोपाठ एक अप्रतिम गाणी देऊन मायकल जगभरातल्या संगीतप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनलेला.

पण या लेखाचा विषय आत्ता मायकल जॅक्सन किंवा पॉप संगीत नसून थोडा निराळाच आहे. जगभरात लोकप्रिय गाण्यांची यादी चार्ट्स या नावाने बनवली जाते. वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे त्यांचे चार्ट्स बनवले जातातच पण पाश्चात्य संगीतात, गाण्याची जगभरातली प्रसिद्धी, अमेरिकेतल्या बिलबोर्ड टॉप १०० काऊण्टडाऊन चार्टमधील त्या गाण्याच्या स्थानावरून ओळखली जाते. गाणं तिथे पहिल्या १० त असेल तर त्या गाण्याची जागतिक विक्री तुफान होते असं मानलं जातं आणि काही अंशी ते खरंही आहे. कारण या संगीताचा मुख्य ग्राहक अमेरिका आहे आणि तिथल्या चार्टमध्ये पहिल्या १० त म्हणजे तडाखेबंद विक्रीचा पुरावाच, नाही का?

तर झालं असं होतं की या बिलबोर्ड टॉप १०० चार्टमध्ये मायकेल जॅक्सन १९८१ पासून अगदी ठाण मांडूनच बसलेला. आता त्याची गाणीच इतकी चांगली होती की कोणत्या ना कोणत्या आकड्यावर ती असायचीच. त्याचं 'बिली जीन किंग' हे गाणं अनेक आठवडे पहिल्या क्रमांकावर होतं. पण १९८३च्या एप्रिल महिन्यात या गाण्याला जोरदार धक्का देऊन बाजूला सारलं, 'डेक्सीज मिडनाईट रनर्स' या ग्रूपच्या 'कमॉन आयलीन' या गाण्याने. त्या काळात ही तशी धक्कादायकच घटना होती.

'डेक्सीज मिडनाईट रनर्स' हा ७८ साली बनलेला मूळचा प्रसिद्ध ब्रिटिश ग्रूप. रॉक, पॉप, जॅझ, ब्लूज यांचं मिश्रण करून 'सोल' तर्‍हेचे संगीत बनवणारा नि गाणारा. त्यांच्या संगीताला 'न्यू वेव म्युझिक' अशा नावानेही संबोधलेलं आढळतं. त्यांचा केवीन रोलँड हा म्होरक्या गायक. 'डेक्सीज मिडनाईट रनर्स'च्या Too-Rye-Ay नावाच्या अल्बममध्ये त्यांनी, केवीन रोलँडने, जिम "बिग जिम" पॅटर्सन आणि बिली अ‍ॅडम्स यांच्या सहकार्याने लिहिलेलं 'कमॉन आयलीन' हे गाणं गायलेलं आहे.

'बिली जीन किंग'ला पहिल्या क्रमांकावरून बेदखल करणार्‍या या गाण्याची सुरूवात सेल्टिक-आयरिश तर्‍हेच्या फिडल (व्हायोलीन) वादनाने होते. पण पुढे गाण्यात रॉक, जॅझ, पॉप आणि कंट्री प्रकारच्या संगीताचं एक भन्नाट मिश्रण होतं आणि हे गाणं जसं जसं पुढे सरकतं तसं तसं आपली पकड घेत जातं. एका विशिष्ठ लयीत सुरू झालेलं गाणं मध्येच विलंबित लयीत सरकतं आणि तिथून हळू हळू लय वाढवून शेवटाला पार नादावून टाकतं. गाण्याच्या अंतर्‍याच्या संगीतामध्ये बॅन्जो, गिटार, फिडल, सॅक्सोफोन आणि ऑर्गन यांचं एकत्र रसायन पार वेड लावतं. सुरूवातीपासून ड्रम्सने अख्ख्या गाण्याला असं जबरदस्त तोलून धरलंय की कुठेच पकड सुटत नाही. नीट कान देऊन ऐकाल तर बॅन्जोने जोडलेलं कंट्री-कनेक्शन भन्नाट आहे. केवीन रोलँडचा आवाजही गाण्यातली भावना व्यवस्थित श्रोत्यापर्यंत पोहोचवतो.

तर ऐका हे 'डेक्सीज मिडनाईट रनर्स'चं 'कमॉन आयलीन'


या वरच्या गाण्याचं कवर वर्जन १९९६ साली 'सेव फेरीज' नावाच्या कॅलिफोर्नियाच्या अमेरिकन ग्रूपने, 'इट मीन्स एव्हरीथिंग' नावाच्या त्यांच्या दुसर्‍या अल्बममध्ये गायलं. त्याचबरोबर हे गाणं त्यांनी 'सिंगल' स्वरूपातही बाजारात आणलं आणि ते ही प्रचंड लोकप्रिय झालं. 'सेव फेरीज'ने या गाण्याचा मूळ ढाचा तोच ठेवला पण त्यांनी जे फरक केले त्यामुळे अनेकांना हे गाणं मूळ गाण्यापेक्षाही जास्त आवडलं.

'सेव फेरीज'ने केलेला मुख्य फरक म्हणजे गायक. त्यांची म्होरकी मोनिक पॉवेल नावाची गायिका होती. त्यामुळे अर्थातच गाण्याचा आवाज 'स्त्री'चा झाला आणि होय महाराजा, हा फरक गाण्याला एक वेगळीच पातळी मिळवून देतो! या गाण्यात मोनिक जबरदस्त गाते आणि विडिओत दिसते सुद्धा मस्त! याशिवाय 'सेव फेरीज'ने मूळ गाण्यातल्या बॅन्जो आणि फिडल या वाद्यांना फाटा दिला आहे पण त्याजागी ट्रंपेट आणि थ्रॉम्बोन वापरलेलं आहे. यामुळे झालंय काय की गाणं एकदम जॅझ वळणाचं रॉक गाणं झालंय. गाण्याची सुरूवातही मूळ गाण्यापेक्षा द्रुत लयीत होते त्यामुळे ड्रम्सची कारागिरीही भन्नाट झालीय. एकाच गाण्याला थोडीशी वेगळी ट्रीटमेण्ट दिल्याने त्यांच्यात कसा फरक पडतो हे या दोन गाण्यांवरून चटकन् लक्षात येतं.

तेव्हा आता ऐका 'सेव फेरीज'चं 'कमॉन आयलीन'


हे अख्खं गाणं "Come On Eileen"

Poor old Johnny Ray
Sounded sad upon the radio
Moved a million hearts in mono
Our mothers cried
Sang along, who'd blame them
Now you're grown, so grown, now I must say more than ever
Toora loora toora loo rye aye
And we can sing just like our fathers

[Chorus:]
Come on Eileen, oh I swear (what he means)
At this moment, you mean everything
With you in that dress my thoughts I confess
Verge on dirty
Ah come on Eileen

These people round here wear beaten down eyes
Sunk in smoke dried faces
They're so resigned to what their fate is
But not us (no never), no not us (no never)
We are far too young and clever
Remember
Toora loora toora loo rye aye
Eileen I'll hum this tune forever

Come on Eileen oh I swear (what he means)
Ah come on, let's take off everything
That pretty red dress Eileen (tell him yes)
Ah come on let's, Ah come on Eileen
That pretty red dress, Eileen (tell him yes)
Ah come on let's, ah come on Eileen
Please...

Come on Eileen too-loo rye-aye
Come on Eileen too-loo rye-aye
Toora toora-too-loora

Now you have grown, now you have shown, oh Eileen
Come on Eileen, these things they are real and I know
how you feel
Now I must say more than ever
things round here have changed
Too-ra loo-ra too-ra loo-rye-aye

[Chorus]

आशा आहे गीतगुंजन मालिकेतलं हे ११ वं पुष्प आवडलं असेल.

जाता जाता - 'कमॉन आयलीन'ने मिळवलेल्या बिलबोर्ड टॉप १०० काऊण्टाडाऊन चार्टमधल्या पहिल्या स्थानाचं सुख फक्त एकच आठवडा टिकलं. त्यांना दुसर्‍याच आठवड्यात मायकेल जॅक्सनच्या 'बीट इट' या गाण्याने धक्का देऊन स्वतःची स्थापना पहिल्या क्रमांकावर केली.

(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

Wednesday, December 14, 2011

गीतगुंजन - १०

गीतगुंजन - १० : I Don't Wanna Miss A Thing

हे गाणं लिहिलंय 'डायान वॉरन' हिने. अनेक अ‍ॅकॅडमी अवॉर्ड्स, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स आणि ग्रॅमी अवॉर्ड्स नॉमिनेशन्स मिळवलेल्या आणि त्यापैकी गोल्डन ग्लोब आणि ग्रॅमी जिंकलेल्या या गीतकर्तीनं 'आर्मागेडॉन' नावाच्या चित्रपटासाठी हे गाणं लिहिलेलं.

पृथ्वीवर धुमकेतूच्या माध्यमातून मोठे अशनीचे तुकडे आपटून ती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाल्यावर त्या धूमकेतूला अंतराळातच अणुबाँबने नष्ट करण्याची योजना आखली जाते आणि त्यासाठी धूमकेतुच्या पृष्ठभागावर भोक पाडण्यासाठी समुद्रामध्ये तळाशी तेलासाठी खोदकाम करणार्‍या एका धाडसी माणसावर ही जवाबदारी टाकण्यात येते. या माणसाची मुलगी त्याच्या सहकार्‍यावरच प्रेम करत असते. तिचे वडिल आणि प्रियकर दोघेही या मोहिमेवर जातात आणि त्यांच्यापैकी कदाचित कोणीही परत येऊ शकणार नाहीत याची सर्वांनाच जाणीव असते. या परिस्थितीत त्यांच्या भावविश्वासंबंधी सदर गाणं लिहिलं गेलं आहे.

आधी हे गाणं 'यू २' नावाचा ग्रूप सादर करणार होता पण काही अपरिहार्य कारणामुळे ते शक्य न झाल्याने त्याचं सादरीकरण 'एरोस्मिथ'ने केलं. या चित्रपटाची नायिका 'एरोस्मिथ'चा लीड सिंगर स्टीव्ह टायलरची मुलगी लिव्ह टायलर आहे आणि गाण्यात एका वडिलांचं आपल्या मुलीवरचं प्रेम दाखवणारं गीतलेखन असल्याने एकूणच याला एक निराळं परिमाण मिळाल्यासारखं वाटतं.

स्टीव्ह टायलर आणि एरोस्मिथनी हे गाणं जबरदस्त सादर केलं आहे. पदार्पणातच हे अमेरीकेत बिलबॉर्ड काऊण्टडाऊनमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं. 'एरोस्मिथ'चं २८ वर्षांनंतर गाणं टॉप १० मध्ये आलं. जगभरात अनेक देशांमध्ये हे अनेक आठवडे टॉपवर राहिलं होतं.

या हार्ड रॉक गाण्याचा आनंद घ्या.....


हे गीत -

I could lie awake just to hear you breathing
Watch you smile while you are sleeping
Well you're far away dreaming
I could spend my life in this sweet surrender
And just stay here lost in this moment forever
Well, every moment spent with you
Is a moment I treasure

[Chorus]
I don't wanna close my eyes
I don't wanna fall asleep
'Cause I'd miss you, babe
And I don't wanna miss a thing
'Cause even when I dream of you
The sweetest dream will never do
I'd still miss you, babe
And I don't wanna miss a thing

Lying close to you
Feeling your heart beating
And I'm wondering what you're dreaming
Wondering if it's me you're seeing
Then I kiss your eyes and thank God we're together
And I just wanna stay with you
Just stay in this moment forever, forever and ever

[Chorus]

I don't wanna miss one smile
I don't wanna miss one kiss
Well, I just wanna be with you
Right here with you, just like this
I just wanna hold you close
Feel your heart so close to mine
And stay here in this moment
For all the rest of time

[Chorus: x2]

Don't wanna close my eyes
Don't wanna fall asleep, yeah
I don't wanna miss a thing

Monday, December 12, 2011

गीतगुंजन - ९

गीतगुंजन - ९ : Black or White

संगीताच्या दुनियेत अनेक प्रतिभावान संगीतकार, गीतकार आणि गायक झालेत की ज्यांची खाजगी आयुष्य कशी का असेनात त्यांच्या संगीतावर आणि अदाकारीवर रसिकांनी आपला जीव ओवाळून टाकला आहे आणि अशा गंधर्वांचे - शापित गंधर्वांचे स्थान त्यांच्या मनात अढळ आहे. अशाच शापित गन्धर्वान्पैकी एक आहे "किंग ऑफ पॉप" - "मायकल जॅक्सन" अर्थात आपला 'एमजे'.

३-४ वर्षांच्या मायकलने आपल्या बहिण-भावांबरोबर संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर 'जॅक्सन ५' नावाचा ग्रूप तयार करून त्यात आपली अदाकारी दाखवू लागला. पण कुटुंबियांचा हा ग्रूप त्याच्या प्रतिभेसाठी अपुरा होता. जाणत्या वयात त्याने आपली स्वतंत्र वाट चोखाळली. १९८० च्या दशकापासून घोंगावणारं ही 'एमजे' नावाचं वादळ अखेर २००९ साली 'एमजे'च्या अकाली मृत्यूने शमलं.

'एमजे'ने दाखवलेल्या अदाकारीला संपूर्ण जगाने प्रणाम केलेला आहे. त्याचे आणि त्याच्या गाण्याचे, अदाकारीचे लाखो करोडो चाहते संपूर्ण दुनियाभर पसरलेले आहेत. शेवटी 'एमजे'ही एक माणूस होता आणि त्याच्याही हातून चुका झाल्या. त्याची गोर्‍या कातडीच्या आणि कॉकेशन चेहरेपट्टीच्या आकर्षणाची जगभरात खिल्ली उडवली गेली कारण यापायीच त्याने स्वत: वर अनेक कॉस्मेटिक शल्यकर्मे करून घेतली होती. त्याच्या या नादापायी त्याने दुर्लक्षिले की लोकांना तो त्याच्या प्रतिभेमुळे आणि अदाकारीमुळे आवडतोय, त्यांचं त्याच्या दिसण्याशी काहीही देणं घेणं नाहीये. तरी यामुळेच तो लोकापासून दुरावला. एकटेपणामुळे त्याला व्यसनं जडली. त्याने केलेली लग्नं नि त्याची मुलंही हे देखील त्याला त्याच्या एकटेपणापासून वाचवू शकली नाहीत. एका बाजूला जगभरातील लोकप्रियता आणि एका बाजूला एकटेपणा यांच्यात 'एमजे' पुरता पिचून गेला नि त्याचं वास्तवाचं भान सुटत गेलं.

अनेक गाणी आहेत 'एमजे'ची ज्यांना इथे स्थान नक्की मिळेल पण पहिलं गाणं नक्कीच असेल - "Black or White".

'मायकेल'चं "Black or White" हे गाणं १९९१ साली त्याच्या 'डेंजरस' या अल्बम मध्ये प्रकाशित झालं. 'एमजे'च्या स्वत:च्या विचारसरणीशी उलट असं गाणं कधी त्याच्याकडून दिलं जाईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. आयुष्यभर गोरी त्वचा आणि कॉकेशन चेहरा मिळवण्याचा प्रयत्न करणा~याने असं गाणं देणं हाच किती प्रचंड विरोधाभास होता. पण 'एमजे'च्या जगभरातल्या चाहत्यांनी त्याचं हे गाणं अगदी डोक्यावर घेतलं. एक तर मोठ्या काळाच्या विश्रांतीनंतर 'एमजे'चं हे गाणं प्रकाशित झालेलं आणि त्याच्या वैयक्तिक आवडीपेक्षा लोक त्याच्या दैवी प्रतिभेवर फिदा होते. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की ३ आठवड्यातच जगभरातल्या चार्टस मध्ये १ ल्या क्रमांकावर पोहोचलं.

या गाण्याच्या विडिओमध्ये 'मायकेल'ने जगभरातील निरनिराळ्या नृत्याविष्कारांना स्थान दिलेलं आणि त्यांच्या पदन्यासावर आपली पावलंही थिरकवलेली. व्यक्तिश: मला 'एमजे'चा हा विडिओ खूप आवडलेला आणि हे गाणंही.

मला खात्री आहे की तुम्हालाही नक्की आवडेल......


आणि हे संपूर्ण गाणं

I Took My Baby
On A Saturday Bang
Boy Is That Girl With You
Yes We're One And The Same

Now I Believe In Miracles
And A Miracle
Has Happened Tonight

But, If
You're Thinkin'
About My Baby
It Don't Matter If You're
Black Or White

They Print My Message
In The Saturday Sun
I Had To Tell Them
I Ain't Second To None

And I Told About Equality
And It's True
Either You're Wrong
Or You're Right

But, If
You're Thinkin'
About My Baby
It Don't Matter If You're
Black Or White

I Am Tired Of This Devil
I Am Tired Of This Stuff
I Am Tired Of This Business
So When The
Going Gets Rough
I Ain't Scared Of
Your Brother
I Ain't Scared Of No Sheets
I Ain't Scare Of Nobody
Girl When The
Goin' Gets Mean

[L. T. B. Rap Performance]
Protection
For Gangs, Clubs
And Nations
Causing Grief In
Human Relations
It's A Turf War
On A Global Scale
I'd Rather Hear Both Sides
Of The Tale
See, It's Not About Races
Just Places
Faces
Where Your Blood
Comes From
Is Where Your Space Is
I've Seen The Bright
Get Duller
I'm Not Going To Spend
My Life Being A Color

[Michael]
Don't Tell Me You Agree With Me
When I Saw You Kicking Dirt In My Eye

But, If
You're Thinkin' About My Baby
It Don't Matter If You're Black Or White

I Said If
You're Thinkin' Of
Being My Baby
It Don't Matter If You're Black Or White

I Said If
You're Thinkin' Of
Being My Brother
It Don't Matter If You're
Black Or White

Ooh, Ooh
Yea, Yea, Yea Now
Ooh, Ooh
Yea, Yea, Yea Now

It's Black, It's White
It's Tough For You
To Get By
It's Black , It's White, Whoo

It's Black, It's White
It's Tough For You
To Get By
It's Black , It's White, Whoo

गीतगुंजन - ८

गीतगुंजन - ८ : Immigrant Song

जिमी पेज, रॉबर्ट प्लाण्ट, जॉन बोन्हॅम आणि जॉन पॉल जोन्स ही चार नावं एकत्र घेताच, जसं 'त' वरून 'ताकभात' ओळखतात, तसं दर्दी कानसेन केवळ एकाच नावाचा गजर करतात आणि ते नाव म्हणजे 'लेड झॅपलिन'. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात स्थापन झालेला हा म्युझिकल बॅण्ड आज अनेक वर्षांनंतरही आपली लोकप्रियता टिकवून आहे. झालेत बहु होतील बहु पण 'लेड झॅपलिन' नही सुना तो हार्ड रॉक नि हेवी मेटल म्युझिकको नहीच सुना अशी परीस्थिती आहे हे नक्की!

सत्तर सालच्या सुमारास 'लेड झॅपलिन' आईसलँडचा स्थानिक सांस्कृतिक खात्याच्या निमंत्रणावरून दौरा करत असताना, रेक्याविक शहरात त्यांचा ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच दिवशी तिथल्या सर्व सरकारी कर्मचार्‍यांनी संप पुकारला. त्यामुळे ही कॉन्सर्ट होतेय की नाही अशी परीस्थिती निर्माण झाली. पण तिथल्या विद्यापीठाने त्यासाठी आपले सभागृह उघडून दिले आणि विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहात ही कॉन्सर्ट संपन्न झाली. बॅण्डच्या या दौर्‍याच्या अनुभवांचा एक भाग म्हणून जिमी पेज आणि रॉबर्ट प्लाण्ट यांनी 'Immigrant Song' हे हेवी मेटल - हार्ड रॉक गाणं रचलं. या गाण्यात स्कॅण्डेनेवियन वायकिंग स्पिरिट पुरेपुर उतरलंय असं 'लेड झॅपलिन' मानतं.

मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा लक्षात राहिलं ते सुरुवातीचं गिटारचं जबरदस्त ओपनिंग जे पुढे आपला सतत माग घेतं. हे आहे जॉन पॉलचं तुफान गिटार बॅस रिफ. नंतर जिमीने आपल्या इलेक्ट्रिक गिटारचा करिष्मा दाखवलाय. जॉन बोन्हॅमचे ड्रम्स गिटार बेसचा झकास पाठपुरावा करतात. या सगळ्याचं एकत्रित रसायन अस्सल हेवी मेटलची ओळख करवून देतं आणि अर्थात ती एका मुलीची वैशिष्ट्यपूर्ण आरोळी! पण नंतर कळलं की ती आरोळी स्वतः बॉब प्लाण्टचीच आहे.

हे अख्ख गाणंच एकूणच झिंगाट आहे यारों!!!

मजा लुटा.........



हे Immigrant Song चे शब्द -

Ah, ah,
We come from the land of the ice and snow,
From the midnight sun where the hot springs blow.
The hammer of the gods will drive our ships to new lands,
To fight the horde, singing and crying: Valhalla, I am coming!

On we sweep with threshing oar, Our only goal will be the western shore.

Ah, ah,
We come from the land of the ice and snow,
From the midnight sun where the hot springs blow.
How soft your fields so green, can whisper tales of gore,
Of how we calmed the tides of war. We are your overlords.

On we sweep with threshing oar, Our only goal will be the western shore.

So now you'd better stop and rebuild all your ruins,
For peace and trust can win the day despite of all your losing.

Sunday, December 11, 2011

गीतगुंजन - ७

गीतगुंजन - ७ : "Here comes the Sun"


साधारण १९६८-६९ च्या सुमारास 'बीटल्स'पैकी 'जॉर्ज हॅरिसन' यानेही आपलं गीतकाराचं कसब दाखवायला सुरुवात केली आणि बीटल्स त्याची गाणीही गाऊ लागले.

आता बीटल्स केवळ परफॉर्मर्स राहिले नव्हते तर त्यांनी Apple Recordsच्या माध्यमातून बिझनेस मध्येही आपले पाय रोवायला सुरुवात केलेली होती. पण कलाकार लोकं या व्यापारी जगतात फारसे रमत नाहीत हे त्यांना लवकरच कळलं. रोज शाळेत जावं तसं Appleच्या ऑफिसात जायचं, अकाऊण्ट्स बघायचे, इथे सही-तिथे सही करत बसायचं, इंग्लंडच्या थंडीमध्ये हे काही त्यांच्यासाठी आनंदाचं काम नव्हतंच. विशेषत: जॉर्ज या दिनक्रमामुळे फारच पकला आणि तो एका निरभ्र उन्हाच्या दिवशी आपल्या मित्राकडे, 'एरिक क्लॅपटन'कडे ऑफिस बुडवून गेला. रुटीन गोष्टींनी थकलेल्या जॉर्जची सृजनशीलता तिथे उफाळून आली आणि एरिकची गिटार घेऊन त्याने तिथेच नवे गाणे लिहिले - "Here comes the Sun".

या गाण्यातील प्रमुख गायक स्वत: जॉर्ज आहे आणि
रेकॉर्डिंगच्या वेळेला त्याला पॉल मॅकार्टनीने साथ केली आहे. रिंगो स्टार नेहमीप्रमाणेच ड्रम्सवर आहे आणि त्यानेच मध्ये एका ठिकाणी टाळ्यांनी छान इफेक्ट दिला आहे. असं म्हणतात की जॉन लेनन या काळात एका अपघातातून सावरत असल्यामुळे या गाण्याच्या ध्वनिमुद्रणात सहभागी झाला नव्हता.

या गाण्याच्या सुरूवातीपासूनच जॉर्ज एखाद्या मोठ्या ताणातून मोकळा झाल्याची एक भावना निर्माण होते. या मोकळ्या भावावस्थेत त्याच्या उल्हसित झालेल्या चित्तवृत्ती इथे छान प्रकारे अभिव्यक्त होतात असं आपलं मला वाटतं. माझं 'जॉर्ज'च्या गाण्यामधलं ऐकलेलं आणि आवडलेलं पहिलं गाणं......


गीत -

Here comes the sun (doo doo doo doo)
Here comes the sun, and I say
It's all right

Little darling, it's been a long cold lonely winter
Little darling, it feels like years since it's been here
Here comes the sun
Here comes the sun, and I say
It's all right

Little darling, the smiles returning to the faces
Little darling, it seems like years since it's been here
Here comes the sun
Here comes the sun, and I say
It's all right

Sun, sun, sun, here it comes
Sun, sun, sun, here it comes
Sun, sun, sun, here it comes
Sun, sun, sun, here it comes
Sun, sun, sun, here it comes

Little darling, I feel that ice is slowly melting
Little darling, it seems like years since it's been clear
Here comes the sun
Here comes the sun, and I say
It's all right

Here comes the sun
Here comes the sun, and I say
It's all right
It's all right

Thursday, December 8, 2011

पॉप संगीतातलं एक सुरेल रत्न - अ‍ॅबा

सत्तर चं दशक हे पूर्णपणे 'डिस्को'चं दशक होतं. सुरुवात 'बीगीज'ने केलेलीच होती पण त्याला कळस चढवण्यासाठी हातभार लागला 'ABBA'चा.

'अ‍ॅनी-फ्रीड' तथा 'फ्रीडा लिंग्स्टाड', 'बियॉर्न उल्वैस', 'बेनी एन्डरसन' आणि 'अ‍ॅग्नेथा फेल्टस्कुग' या चार जणांच्या नावाच्या आद्याक्षरानी बनवलेला त्यांचा ग्रूप 'ABBA'. यातील बियॉर्न आणि अ‍ॅग्नेथा आधीच एकमेकांच्या लग्नबंधनात अडकलेले तर बेनी आणि फ्रीडा लिव-इन कपल होते (यथावकाश त्यांनीही एकमेकांशी लग्न केलं.)




घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने - बियॉर्न, बेनी, अ‍ॅन-फ्रीड आणि अ‍ॅग्नेथा.


१९७२ ते १९८३ या काळात अनेक अप्रतिम गाणी यांनी दिली. हा ग्रूप मूळचा स्वीडिश. स्वीडन मध्ये लोकप्रिय झाल्यावर 'बियॉर्न' आणि 'बेनी'ने इंग्लिश गाणी लिहून सादर करण्याला सुरुवात केली. गायिका होत्या अ‍ॅग्नेथा आणि फ्रीडा. साधे साधे कोणालाही समजतील असे इंग्लिश शब्द, साधेसे विचार आणि नृत्योन्मुख करणारं डिस्को म्युझिक यांच्या बळावर 'ABBA'ने संगीत जगतावर राज्य केलं.

१९७५ साली त्यांच्या एका गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला. एकाच वेळी जगातील १३ देशांमध्ये ते १ल्या क्रमांकावर होते, इतर अनेक देशांतील चार्टस मध्ये ते पहिल्या १० मध्ये होते.

'ABBA'ची गायिका अ‍ॅग्नेथा एका कार्यक्रमात म्हणाली होती की संगीताच्या दुनियेत कोणतं गाणं हिट होईल आणि कोणतं नाही हे नक्की कधीच सांगता येत नाही पण याला अपवाद फक्त या एका गाण्याचा आहे कारण हे जेव्हा बनत होतं, तेव्हापासूनच आम्हाला समजत होतं की गाणं प्रचंड म्हणजे प्रचंड हिट होणार आहे.
तर असं हे गाणं होतं, "Dancing Queen".

तेव्हा त्या जबरदस्त गाण्याचा आपणही आनंद घेऊ या.......



'ABBA' ची गाणी खूप गाजली. 'बियॉर्न' आणि 'बेनी'चे कॉनसेप्टस, शब्द आणि चाली, अ‍ॅग्नेथा आणि फ्रीडा यांचं सहज सुंदर गायन यांद्वारे एक power packed रसायन बनायचं. त्याची धुंदीच चढायची जणू! आता हे पुढील गाणं त्याचाच नमुना आहे.

प्रेमात पडलेली स्त्री आपल्या प्रियकराचे सर्व अपराध पोटात घालते, त्याला क्षमा करते. का? कारण तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय इतर कुणाचा ती विचारच करू शकत नाही. बस्स! या एका सिद्धांतावर बनलंय 'ABBA'चं गाणं "Mama Mia".

म्हटलं तर 'ABBA'चं सगळच स्टायलिश होतं, म्युझिक, गाणी, पर्फोर्मंस आणि अगदी त्यांचे कपडेसुद्धा. आपल्या बोलीवूडी हिंदी चित्रपटातील अनेक गाण्यांचे प्रसंग- वेशभूषा त्यांच्या फॅशन वरून उचलल्याचं स्पष्ट दिसतं. आता हे गाणं ऐकल्यावर काहींना गाण्याच्या चालीही उचलल्याचं आढळलं तर त्या 'इन्स्पायर्ड' होत्या असा आपण युक्तिवाद करून टाकू या.... काय?

आनंद घ्या 'ABBA'च्या "Mama Mia"चा......




'ABBA'ची गायिका 'फ्रीडा' हिच्यासाठी 'ABBA'चे मेंबर 'बियॉर्न' आणि 'बेनी' यांनी लिहिलेले गाणे "Fernando". हे तिच्या पहिल्या स्वीडिश अल्बममध्ये वापरले गेले आणि तुफान हिट झाले.

त्यामुळे लगेचच बियॉर्न आणि बेनी यांनी ते 'इंग्लिश'मध्ये लिहून 'ABBA'साठी रेकोर्ड करायची योजना आखली. त्याप्रमाणे 'इंग्लिश'मध्ये हे गाणं १९७५मध्ये 'सिंगल' या स्वरूपात प्रकाशित झालं आणि त्यांच्या जगभरात लोकप्रिय गाण्यांच्या यादीत एकाची भर पडली.

या गाण्यासाठी फ्रीडाचा आवाज छान लागलेलाच आहे पण त्यातूनही अ‍ॅग्नेथाचा खर्ज ही भारी लागलेला आहे.
एका वेगळ्या धर्तीच्या गाण्यासाठी जरूर ऐका..... "Fernando"


सत्तरच्या दशकात युरोपात आंतर-युरोप गाण्याच्या स्पर्धा होत असत. याला 'युरोविजन' असं नाव होतं. यामध्ये युरोपातले देश आपापल्या भाषांतील गाणी सादर करून सामील व्हायचे. यात यशस्वी झालेली गाणी पुढे युरोपात खूपच प्रसिद्ध व्हायची.

'ABBA'चे मेम्बर्स 'ABBA' बनण्यापूर्वीपासूनच संगीत क्षेत्रात प्रसिद्धी पावलेले होते आणि १९७३ साली ते या युरोविजन स्पर्धेत तिस~या क्रमांकावर राहिले होते. १९७४ साली त्यांनी "ABBA'च्या नावे प्रवेशिका धाडली आणि गाणं पाठवलं, "Waterloo".

या गाण्याची पार्श्वभूमी फारच मस्त आहे. ऐतिहासिकदृष्ट्या नेपोलियनला पराभवाचा पहिला झटका बसला 'वाटेर्लू' च्या लढाईत. (त्याने आपला पूर्ण पराभव त्यानंतर ४ महिन्यांनी 'रोशफोर्ट'च्या लढाईच्या वेळी मान्य केला असला तरी) या गाण्यात 'वाटेर्लू'चाच संदर्भ घेतलेला आहे. प्रेमाच्या आणाभाका घेण्यात उत्सुक असलेल्या एका मुलीचे मनोगत 'ABBA' यात व्यक्त करत आहेत. ती मुलगी या पूर्ण प्रक्रियेला नेपोलियनच्या वाटेर्लू मधल्या सरेंडरच्या प्रक्रियेशी बद्ध करतेय. त्याच्या सरेंडर प्रमाणेच मी प्रेमात माझ्या प्रियकराला सरेंडर (समर्पित) करत आहे. ती पुढे असं ही म्हणते की यात माझा नेपोलियन सारखाच पराजय झालाय पण माझ्या या पराभवातच माझा विजय लपलेला आहे.

हे गाणं १९७४च्या युरोविजन मध्ये 'ABBA'ने जबरदस्त प्रस्तुत केलं. परभाषेतील असूनही अग्नेथा आणि फ्रीडा यांनी हे गाणं फारच छान गायलं. त्यांची वेशभूषा सोल्लिड होती. विडिओची फ्रेम अन फ्रेम झकास बनलेली. त्यावर कहर म्हणजे त्या काळात युरोविजन मध्ये न ऐकू येणारे डिस्को बीट्स. हे गाणं युरोविजनचं विजेता गाणं ठरलंच पण एरवी जी युरोविजन विजेती गाणी युरोपाबाहेर कुठेच लोकप्रिय होत नव्हती त्याला छेद देऊन जगभरात लोकप्रिय झालं.

हे तुफान गाणं ऐकायलाच हवंय......


'ABBA' चं एक गाणं खूपच स्पेशल म्हणावं लागेल.

१९७९ मध्ये 'युनिसेफ'च्या 'म्युझिक फोर युनिसेफ कॉनसर्ट' या चेरीटी कार्यक्रमात या गाण्याचा अंतर्भाव करण्यात आला आणि याचं प्रसारण 'युएन जनरल असेम्ब्ली'मधून जगभरात करण्यात आलं. या कार्यक्रमामुळे 'ABBA'ने या गाण्याची अर्धी रॉयलटी 'युनिसेफ'ला दिली. याच्या जगभरातल्या प्रसारणानंतर हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की अनेक देशांत १ल्या क्रमांकावर राहिलं तर अनेक देशांतील चार्टस मध्ये पहिल्या १०त. एकूण या गाण्याने 'युनिसेफ'लाही पुष्कळ पैसा मिळवून दिला.

तर असं हे "Chiquitita" गाणं.

'Chiquitita ' या स्पेनिश शब्दाचा अर्थ 'लहान मुलगी' असा आहे. 'युनिसेफ'च्या १९७९ च्या 'आंतरराष्ट्रीय बालकवर्षा'शी सुसंगत असं हे गाणं ऐका......


'ABBA'चं आणखी एक गाणं जे मला स्वत:ला खूप आवडतं.......

१९७९ साली प्रकाशित झालेलं हे गाणं एक अप्रतिम 'इन्स्पिरेशनल' गाणं आहे. साधे पण अर्थगर्भ शब्द, संथ पण सुंदर चाल, शेवटचा कोरस आणि फ्रीडाचा काळीज चिरत जाणारा आवाज...... सारंच कसं एकदम दुस~या जगातील वाटतं, नाही?

फक्त गाण्याची सुरुवात आणि शेवट ऐकून आपल्या बॉलीवूडच्या आणखी एका 'इन्स्पायर्ड' गाण्याची आठवण होते आणि आपल्याला पुन्हा याच जगात आणून ठेवते.



ही वानगी दाखल काही पण अशा अनेक गाण्यांनी मलाच काय पण जगभरातील असंख्य संगीतप्रेमींना भरभरून आनंद दिलाय. माझा हा प्रयत्न मात्र केवळ माझ्या मिपाकर मित्रांना ही माहिती आणि त्याद्वारे धकाधकीच्या जीवनात थोडा आनंद देण्याचाच आहे.

'अ‍ॅबा' हे खरोखरच पॉप संगीताला पडलेलं एक अत्यंत सुंदर स्वप्न होतं. या स्वप्नाने अनेक अप्रतिम गाण्यांची निर्मिती केली. प्रत्येक गाणं अगदी बावनकशी सोनंच जणू. १९८२ साली 'अ‍ॅबा'चे सदस्य आपापल्या मार्गाने जाण्यासाठी वेगळे झाले. त्यातल्या प्रत्येकाने स्वतंत्र वाट चालली आणि तिथेही काही प्रमाणात यशस्वी झाले पण एकत्रीतपणे अ‍ॅबाने जे यश पाहिले ते त्यांना पुन्हा मिळवणे शक्य झालेही नाही.


२००८ साली त्यांच्या संगीतावर आधारीत 'मामा मिया' नावाचा नितांत सुंदर चित्रपट प्रदर्शित झाला. पिअर्स ब्रॉस्नन आणि मेरील स्ट्रीप यांच्या अप्रतिम अदाकारीने नटलेल्या या चित्रपटात अ‍ॅबाची पूर्वीची गाणी गुंफलेली आहेत. या गाण्यांच्या निमित्ताने बियॉर्न नि बेनी एकत्र आले. किमान मला तरी यामुळेच 'मामा मिया'तली गाणी पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली.

'अ‍ॅबा'बद्दल शेवटी मला जे वाटतं ते त्यांच्याच एका गाण्यात त्यांनी वर्णन केलं आहे असं मला वाटतं. बहुतेक तुम्हीही हे मान्य कराल. So lets say, ABBA, "Thank You For The Music For Giving It To Me"



Wednesday, December 7, 2011

गीतगुंजन - ६

या प्रकारच्या संगीताचा नुसता उल्लेख ऐकला तरी मनात एक प्रकारचं अवस्थांतरण होतं. जणू झिंग चढल्यासारखी भावना होते. मन आणि तन दोन्ही झुलायला लावण्याचं सामर्थ्य यात आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी काही संगीताचा अभ्यासक नाही पण हा प्रकार आवडतो आपल्याला! अगदी लहान असताना जेव्हा पहिल्याने या प्रकारचं संगीत ऐकलं तेव्हाच का माहित नाही पण ते प्रचंड आवडून गेलेलं. आजही ती आवडण्याची भावना तसूभरही कमी झालेली नाही. हे संगीत उत्स्फुर्त आहे, सळसळतं आहे, नजाकतभरं आहे, कोणत्याही वयातल्या व्यक्तिला डोलायला लावणारं आहे, सरळ आहे, वाकडं आहे, जुनं आहे पण त्याचवेळी तितकंच नाविण्यपूर्ण आहे, करामती आहे, गूढ आहे आणि अगदी झणझणीत आहे कारण हे संगीत 'जॅझ' आहे.
 
असं म्हणतात की जॅझ संगीत हे पश्चिम आफ्रिकेतून अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या लोकांच्या लोकसंगीताचा युरोपियन तथाकथित अभिजात संगीताशी झालेल्या संकराचा परिणाम आहे. कुणास ठाऊक, मला माहिती नाही. पण युरोपियन वाद्यांवर निर्माण होणार्‍या या जॅझ संगीतावर असलेला कृष्णवर्णीयांचा ठसा कुणीच पुसू शकत नाही. गुलामगिरीच्या काळात झालेले शारीरिक श्रम विसरण्यासाठी आणि स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी कृष्णवर्णीयांकडून या संगीताची कास धरली गेली. पुढे गुलामगिरी कायद्याने बंद झाल्यावर अनेकांना या जॅझ संगीताने आधार दिला. हळू हळू हे संगीत मुख्य प्रवाहात सामील झालं आणि आता हे देखिल अभिजात संगीताचा एक भाग बनलं आहे. 

गीतगुंजन - ६ : All That Jazz

जॅझ संगीत खरोखरच एक उत्स्फुर्त संगीत आहे. ड्रम्स, ट्रंपेट, सॅक्सोफोन, डबल बॅस, पियानो आणि साडेतीन सप्तकात लीलया फिरणारा एक आवाज असं एखादं एकत्रित मिश्रण जेव्हा या जॅझ संगीतात तयार होतं तेव्हा तो एक खतरनाक अनुभव असतो. असाच अनुभव आपल्याला येतो 'All That Jazz' या गाण्यात. 

या गाण्यात काय नाही? हॅरी 'स्वीट' एडिसनचं अफलातून ट्रंपेट आहे, बॉबी डरहॅमची ड्रम्सवरची अदाकारी आहे, बेनी कार्टरचा अप्रतिम सॅक्सोफोन आहे आणि याशिवाय या गाण्याला आपल्या डबल बॅसने तोलणारा रे ब्राऊन आहे. या सगळ्यांच्या बरोबरीने १९८९ साली रेकॉर्ड झालेल्या या गाण्यात, त्यावेळी अवघ्या ७२ वर्षांच्या असलेल्या एला फिट्झजेराल्डचा जबरदस्त आवाज आहे. एला फिट्झजेराल्ड, तुफान स्कॅटर आणि माझी जॅझ संगीतातली ऑलटाईम फेवरेट गायिका. हे गाणं, याच नावाच्या, तिच्या शेवटच्या स्टुडिओ अल्बममध्ये आहे.

मला खात्री आहे, 'All That Jazz' तुम्हाला नक्की आवडेल.


हे या गाण्याचे बोल - 

I'm in love with you
And all that jazz
You're my dream come true
And all that jazz
Baby, you're too much
You've got the skin I love to touch
The skin I love to touch too much, mmm
And all that jazz
You have got the lips that suit my taste
And your fingertips can't be replaced
Oh, baby, what you've got, nobody has
And I've got you
And all that jazz 

(Instrumental-Scatting Improvisation)

I said I'm in love with you
And all that jazz
You're my dream come true
And all that jazz
Baby, you're too much
You've got the skin I love to touch
The skin I love to touch too much, mmm
And all that jazz
You have got the lips that suit my taste
And your fingertips can't be replaced
Oh, baby, what you've got, nobody has
And I've got you
And all that jazz



Tuesday, December 6, 2011

गीतगुंजन - ५

गीतगुंजन - ५ : Its My Life

पडद्यावर बॉन जोवी, लॉस एंजलीस शहरातल्या सेकण्ड स्ट्रीट टनेल मध्ये गातोय आणि ते टॉमी आपल्या घरून कॉम्प्यूटरवर लाईव बघतोय. इतक्यात त्याला त्याच्या जिना नावाच्या मैत्रीणीचा फोन येतो. ती त्याच  ठिकाणी ते गाणं ऐकतेय आणि त्याला विचारतेय, "अरे तू कुठेयस? इथे बॉन जोवी धमाल गातोय तर ताबडतोब ये. तुझ्याकडे ५ मिनिट्स आहेत."

आणि या नंतर पडद्यावर एक तुफानी धावाधाव दिसते. बॉन जोवीच्या कॉन्सर्टसाठी जीवाच्या आकांताने पळणारा टॉमी, त्याच्या मार्गात येणारे निरनिराळे अडथळे, या अडथळ्यान्ना चुकवून ते गाणं लाईव ऐकायला जाण्यासाठी केलेले त्याचे प्रयत्न आणि हे सारं होत असताना पार्श्वभागी ऐकू येणारं बॉन जोवीचं गाणं, "Its My Life."

हे सारं एक भन्नाट रसायन आहे.

ऑस्कर विजेता (सर्वोत्तम ध्वनि-मुद्रणासाठी) चित्रपट यु-५७१ च्या चित्रिकरणानंतर काही दिवसातच २००० साली बॉन जोवीने हे गाणं, रिची साम्बोरा आणि मॅक्स मार्टिन यांच्या सहकार्याने लिहिलं आणि आपल्या 'क्रश' नावाच्या अल्बमसाठी रेकॉर्ड केलं. यातल्या "Its My Life" या शब्दांमुळे हे गाणं सर्व थरातल्या लोकांकडून आणि त्यातही विशेषत: नवयुवकांकडून स्वत:चं आयुष्य स्वत: घडवण्याच्या विचाराने मोठ्याप्रमाणावर उचललं गेलं आणि परिणामी ते अनेक देशांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत "चोटीकी पादान पर" जाऊन बसलं. 

चपखल शब्द, मस्त चाल, सॉलिड रिदम, सुरेल सिंथेसायजर आणि जबरदस्त गिटार रीफ यांचा एकत्रित परिणाम म्हणून या गाण्याला ग्रॅमी अवोर्ड्सचं 'सर्वोत्तम रॉक' गाण्याचं नॉमिनेशनही मिळालेलं.

एकदा बॉन जोवीचं हे खतरनाक रॉक गाणं आणि त्याचा अप्रतिम विडिओ अवश्य बघा......


हे गीत - 
This ain't a song for the brokenhearted
No silent prayer for the faith departed
And I ain't gonna be just a face in the crowd
You're gonna hear my voice when I shout it out loud

It's my life
It's now or never
I ain't gonna live forever
I just wanna live while I'm alive

(It's my life)
My heart is like an open highway
Like Frankie said, "I did it my way"
I just wanna live while I'm alive
'Cause it's my life

This is for the ones who stood their ground
For Tommy and Gina who never backed down
Tomorrow's getting harder, make no mistake
Luck ain't even lucky, gotta make your own breaks

It's my life
And it's now or never
I ain't gonna live forever
I just wanna live while I'm alive 

(It's my life)
My heart is like an open highway
Like Frankie said, "I did it my way"
I just wanna live while I'm alive
'Cause it's my life

You better stand tall
When they're calling you out
Don't bend, don't break
Baby, don't back down

It's my life
It's now or never
'Cause I ain't gonna live forever
I just wanna live while I'm alive

(It's my life)
My heart is like an open highway
Like Frankie said, "I did it my way"
I just wanna live while I'm alive

(It's my life)
And it's now or never
I ain't gonna live forever
I just wanna live while I'm alive

(It's my life)
My heart is like an open highway
Like Frankie said, "I did it my way"
I just wanna live while I'm alive
'Cause it's my life!

Sunday, December 4, 2011

गीतगुंजन - ४

गीतगुंजन - ४ : When I Come Around

१९९५ मध्ये एम टीवी भारतात येऊन काही वर्षंच झाली होती. सुरूवातीला चक्क दूरदर्शनवरच दिवसातल्या दोन तासात ते दाखवलं जातं होतं ते ही आठवतंय. पुढे केबल टीवीच्या माध्यमातून एका संपूर्ण चॅनलच्या स्वरूपात एम टीवीने आपल्या घरात प्रवेश केला. मी देखिल त्याच सुमारास हे चॅनल बघायला सुरूवात केली होती. इंग्लिश कळण्याची मारामार होती पण रॉक, पॉप आणि ब्लूज संगीताचं आकर्षणही तितकंच होतं. ते असं स्वस्थ थोडीच बसवू देत होतं? काही वेळा अधाशासारखं समोर दिसेल ते ऐकत होतो. त्यातूनच टेस्ट डेवलप होते असं कुणीतरी सांगितलं होतं. रॅपचं फॅड जोरात होतं. शब्द तेव्हा कळायचेच नाहीत पण ताल झिंग आणायचा.

याच सुमारास हळूहळू अशा संगीत प्रकारांचे उपप्रकारही असतात असं समजू लागलं. मग एक दिवस ऐकलं 'ग्रीन डे'चं "When I Come Around."

बिली जो आर्मस्ट्राँग, माईक डर्न्ट आणि ट्रे कूल या ऐन विशीतल्या मुलांचा बँड होता 'ग्रीन डे', आणि त्यांचं संगीत पंक रॉक प्रकारचं होतं. बिलीने आपल्या मैत्रिणीशी एड्रियेनेशी झालेल्या ब्रेक अप नंतर हे गाणं लिहिलेलं. (पुढे तिच्याशीच त्याने लग्नही केलं.) या गाण्याचं संगीत आणि सादरीकरण तेव्हाही खास वाटलेलं. त्याचे शब्दही सहज समजतील असेच आहेत. 

या गाण्याच्या निमित्ताने तेव्हा मला एक साक्षात्कारही झालेला, तो ही तुमच्याशी वाटून घेण्यात हरकत नाही. याच दिवसात अचानक कॉलेजमधल्या अनेक मुलांकडे एकाच वेळी सारख्या डीझाईनचे स्वेटर्स आणि टी-शर्टस दिसायला लागले. फिकट रंगावर त्यातल्याच गडद छटेचे आडवे पट्टे. अगदी या ग्रीन डेच्या गाण्यात बिलीने घातलेल्या डिझाईनचेच. तेव्हाच मला कळलं, पाश्चात्य संगीताचं क्षेत्र आता भारतातील मुलांचीही स्टाईल घडवू लागले होते.

एकदा आनंद घ्या या पंक रॉक प्रकारच्या गाण्याचा.



हे अख्खं गाणं 
I heard you crying loud,
all the way across town
You've been searching for that someone,
and it's me out on the prowl
As you sit around feeling sorry for yourself
Well, don't get lonely now
And dry your whining eyes
I'm just roaming for the moment
Sleazin' my back yard so don't get so uptight
you been thinking about ditching me

No time to search the world around
Cause you know where I'll be found
When I come around

I heard it all before
So don't knock down my door
I'm a loser and a user so I don't need no accuser
to try and flag me down because I know you're right
So go do what you like
Make sure you do it wise
You may find out that your self-doubt means nothing
was ever there

You can't go forcing something if it's just
not right

No time to search the world around
Cause you know where I'll be found
When I come around

No time to search the world around
Cause you know where I'll be found

When I come around
When I come around
When I come around
When I come around

गीतगुंजन - ३

गीतगुंजन - ३ : Cecilia

१९७० साली 'पॉल सिमॉन'ने एक अफलातून गाणं लिहिलं आणि त्यानेच ते आपला सांगीतिक जोडीदार आर्ट गार्फुन्केल याच्या सोबतीने आपल्या 'ब्रीज ओवर ट्रबल्ड वॉटर' या अल्बम मध्ये सादर केलं. ते गाणं होतं 'सिसीलिया'.

हे गाणं एका उठवळ प्रेयसीवर आहे. ही प्रेयसी आपल्या प्रियकराला अनेकदा सोडून जाते, त्याच्या भावनांशी सतत खेळते पण हा तिचा प्रियकर मात्र ती सतत त्रास देत असूनही तिची मनधरणी करत राहतो. पण असं ही म्हणतात की कॅथलिक परंपरेत संगीतकलेची देवता सेण्ट सिसीलिया हिच्या संबंधी हे गाणं आहे आणि संगीतकाराच्या योग्य सृजनाच्या अभावाविषयी ही त्याची भावना आहे. (अर्थात हे मला स्वतःला तरी अजिबात पटत नाहीये. तो पहिला भागच जास्त योग्य वाटतोय, नाही?)

इथे ऐका हे भन्नाट Folk Rock गाणं....


१९९५ साली 'मॅडनेस'चा लीड सिंगर 'सग्ज'ने या गाण्याचं कवर व्हर्जन गायलं आणि त्याचा भन्नाट विडिओ बनवला. तो इथे बघा आणि ऐका....



हे अख्खं गाणं 

Cecilia, you're breaking my heart
You're shaking my confidence daily
Oh, Cecilia, I'm down on my knees
I'm begging you please to come home

Cecilia, you're breaking my heart
You're shaking my confidence daily
Oh, Cecilia, I'm down on my knees
I'm begging you please to come home
Come on home

Making love in the afternoon with Cecilia
Up in my bedroom (making love)
I got up to wash my face
When I come back to bed
Someone's taken my place

Cecilia, you're breaking my heart
You're shaking my confidence daily
Oh, Cecilia, I'm down on my knees
I'm begging you please to come home
Come on home

Jubilation, she loves me again,
I fall on the floor and I'm laughing,
Jubilation, she loves me again,
I fall on the floor and I'm laughing

Saturday, December 3, 2011

गीतगुंजन - २

गीतगुंजन - २ : Fame

'फेम' डेविड बोवीचं १९७५ सालचं गाणं. काही दिवसांतच बिलबोर्ड काऊण्टडाऊनमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलेलं.

डेविड बोवी हा एक अवलिया कलाकार. लहान वयातच संगीतामध्ये कारकिर्द करण्याचा याने निश्चय केला. सुरुवातीला प्रचंड अपयशाला तोंड द्यावं लागलेल्या डेविडने जेव्हा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी खेळून 'झिगी स्टारडस्ट' या नव्या व्यक्तिरेखेला निर्माण केलं (१९७२) आणि त्याचं पर्यवसान एका नव्या 'रॉक-कल्ट' निर्मितीत झालं. 'झिगी स्टारडस्ट'च्या यशामुळे जगभरात त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला आणि यथावकाश डेविड लॉस एन्जलिसला स्थायिक झाला (१९७४).

अमेरिकेमध्ये असताना १९७५ सुमारास त्याने त्याचं पहिलं, अमेरिकन चार्ट्स मधलं 'चोटीकी पादान'चं गाणं गायलं. तेच "फेम".

सुरुवातीच्या काळात, जेव्हा बोवी न्यू यॉर्कमध्ये रहायचा तेव्हा त्याची मूळ इंग्लिश गायक-संगीतकार आणि बीटल जॉन लेननशी भेट झाली. दोघांनी अनेकदा एकत्र जॅम सेशन्स केली. जॉनला बोवीचं संगीत आवडायचं पण तो त्याच्या संगीताला "लिपस्टिक लाऊन गायलेलं रॉक संगीत" म्हणायचा. याचा संदर्भ बोवीच्या 'झिगी' अवताराकडे असायचा.

अशाच एका जॅम सेशन दरम्यान बोवीच्या कार्लॉस अ‍ॅलोमर नावाच्या गिटारिस्टने लिहिलेल्या एका जबरदस्त रिफवर जॉन आणि डेविडने गीत-संगीत जुळवलं आणि गाणं निर्माण झालं, "फेम". यात जॉनने डेविडला बॅकिंग व्होकल देऊन साथ केलेली आहे.

"प्रिटी वूमन" (१९९०) या प्रसिद्ध चित्रपटातही हे गाणं चपखल योजलं गेलेलं आहे.

आनंद घ्या
Fame '90' या भन्नाट फन्क रॉक - सॉल प्रकारच्या गाण्याचा......




इथे मूळ गाणं छान ऐकू येतं...



Fame, (fame) makes a man take things over
Fame, (fame) lets him loose, hard to swallow
Fame, (fame) puts you there where things are hollow
Fame (fame)

Fame, it's not your brain, it's just the flame
That burns your change to keep you insane (sane)
Fame (fame)

Fame, (fame) what you like is in the limo
Fame, (fame) what you get is no tomorrow
Fame, (fame) what you need you have to borrow
Fame (fame)

Fame, "Nein! It's mine!" is just his line
To bind your time, it drives you to, crime
Fame (fame)

Could it be the best, could it be?
Really be, really, babe?
Could it be, my babe, could it, babe?
Could it, babe? Could it, babe?

Is it any wonder, I reject you first?
Fame, fame, fame, fame
Is it any wonder you are too cool to fool
Fame (fame)

Fame, bully for you, chilly for me
Got to get a rain check on pain (pain)
(Fame)

Fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame,
fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame, fame
Fame
What's your name?

Thursday, December 1, 2011

गीतगुंजन - १


सध्या आपल्याला हवा तेवढा वेळ आपण आपल्या आवडत्या गोष्टीसाठी काढू शकू अशी काही परिस्थिती नाही. पण म्हणून आपल्याला त्या गोष्टींपासून फार काळ स्वत:ला दूर ठेवणही अशक्य होतं. अशा वेळेला काय करावं? मग मी माझ्यापुरता यातून मार्ग काढायचं ठरवलंय. जसं शक्य होईल तसं आपल्या आवडत्या एखाद्या गाण्यावर चार ओळी लिहून त्याची माहिती आणि त्या गाण्यातला आनंद आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करण्याचा माझा उद्देश आहे.

त्यासाठीच ही 'गीतगुंजन' मालिका सुरू करत आहे. खरं तर ही कल्पना काल 'रे चार्ल्स'चं गाण्याची पोस्ट लिहिताना आली आणि आजच तिला मूर्त रूप दिलं जातंय. या संबंधी सगळ्या पोस्ट गीतगुंजन नावानेच तयार होतील मात्र या नावापुढे गाण्यानुसार पुढची पुढची संख्या येईल म्हणजे कधी पुढे शक्य झाल्यास गीतगुंजन पोस्ट्सचं एकत्रीकरणही सुलभ होईल.


ठीक तर, आता गीतगुंजन मालिकेचं पाहिलं पुष्प जोडतो.

गीतगुंजन - १ : You Don't Know How It Feels

एम टीव्हीचं भारतात नुकतंच पदार्पण झालं होतं तेव्हाचा काळ. साल बहुतेक ९३-९४ असावं. कॉलेजात जायला सुरुवातच केलेली असल्याने शिंगं फुटायला लागलेली. वर्गातल्या इंग्लिश मिडियम मधल्या मुलांच्या गप्पा, अलाणा रॉक ग्रूप, फलाणा पॉप ग्रूप, हा लीड सिंगर नि तो लीड सिंगर, असल्या काहीतरी असायच्या. हे नवं होतं आणि माहिती शून्य. तेव्हा नव्याने सुरू झालेल्या एम टीव्हीचा आसरा घेतला आणि तत्कालीन माहिती जमा करू लागलो. याच दरम्यान भेटला टॉम, टॉम पेटी. मल्टीपल इन्स्ट्रुमेन्ट्स वाजवणारा, गीतकार, संगीतकार आणि गायक आणि भावलं, त्याचं पाहिलेलं पहिलंच गाणं You don't Know How It Feels.

साधे, अगदी मलाही समजू शकणारे शब्द, एका छानशा मंद तालात वाजणारा ड्रमसेट आणि स्वतः टॉमची इलेक्ट्रिक गिटार नि त्याचा हार्मोनिका. या हार्मोनिकाने त्यावेळी घातलेलं गारूड आजही तसंच आहे आणि मुख्यतः त्याची कोणताही अभिनिवेश नसलेली गायकी. एक वेगळंच रसायन बनतं.

इंग्लिश गाण्याला विडीओ असतो, हे तेव्हा नवंच होतं. आणि या गाण्याचा विडीओही मला आवडलेला. त्यावर्षीचं एम टीव्हीचं Best Music Video Award याच गाण्याच्या विडीओला मिळालेलं.

तेव्हा आता आनंद घ्या टॉम पेटीच्या You don't Know How It Feels या मस्त रॉक गाण्याचा....

You Don't Know How It Feels (Video Version) Video | Tom Petty | Contactmusic.com

Let me run with you tonight
I'll take you on a moonlight ride
There's someone I used to see
But she don't give a damn for me
 
But let me get to the point, let's roll another joint
And turn the radio loud, I'm too alone to be proud
You don't know how it feels
You don't know how it feels to be me
 
People come, people go
Some grow young, some grow cold 
I woke up in between
A memory and a dream
 
So let's get to the point, let's roll another joint
Let's head on down the road
There's somewhere I gotta go
And you don't know how it feels
 
My old man was born to rock
He's still tryin' to beat the clock
Think of me what you will
I've got a little space to fill
 
So let's get to the point, let's roll another joint
And let's head on down the road
There's somewhere I got to go
And you don't know how it feels
You don't know how it feels
No, you don't know how it feels to be me
 
You don't know how it feels
You don't know how it feels
No, you don't know how it feels to be me 

Wednesday, November 30, 2011

सुप्रभात मित्रांनो!

सकाळी सकाळी आठवण झाली 'रे चार्ल्स'ची.

या अमेरिकन गीतकार, संगीतकार आणि गायकाने चांगली ५०-५५ वर्ष संगीत रसिकांवर आपल्या सूरांचं गारुड घातलं.

आधी उल्लेख झालेल्या 'ब्लूज' संगीताचाच एक प्रकार असलेला 'सोल' (Soul) संगीत, हे याची खासियत! ब्लूज संगीतालाच फ्रेंच गोस्पेल आणि जाझ ~हीदम्सची जोड मिळून बनलेल्या सोल संगीतात गुंफलेलं चार्ल्सचं हे गाणं त्याचं पहिलंच नंबर १ चं गाणं बनलं आणि मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

या गाण्यात जरा आपल्या

"कार्येषु मन्त्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रम्भा । 
धर्मानुकूला क्षमया धरित्री भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा ॥"

या उक्तीचा भास होतोय असं आपलं उगाच वाटतंय मला....

मला खात्री आहे की तुम्हा सर्वांनाच हे गाणं नक्की आवडेल....


I've Got A Woman

well
I got a woman way over town that's good to me oh yeah
Say I got a woman way over town good to me oh yeah
She give me money when I'm in need
Yeah she's a kind of friend indeed
I got a woman way over town that's good to me oh yeah

She saves her lovin early in the morning just for me oh yeah
She saves her lovin early in the morning just for me oh yeah
She saves her lovin just for me oh she love me so tenderly
I got a woman way over town that's good to me oh yeah

Sax Solo

She's there to love me both day and night
Never grumbles or fusses always treats me right
Never runnin in the streets and leavin me alone
She knows a woman's place is right there now in her home

I got a woman way over town that's good to me oh yeah
Say I got a woman way over town that's good to me oh yeah
Oh she's my baby now don't you understand
Yeah and I'm her lover man
I got a woman way over town that's good to me oh yeah

A Don't ya know she's alright
A Don't ya know she's alright
she's alright she's alright
Whoa yeah oh yeah oh
 

माय लिटिल यल्लो बास्केट - एला फिट्झराल्ड

नमस्कार दोस्त हो!

छोट्या भाचीशी खेळताना बालगीतांचा विचार डोक्यात घोळू लागला. आपल्या मराठीत बालगीतं, बडबडगीतं यांची ब~यापैकी रेलचेल आहे. तशीच ती इंग्लिश मध्येही आहे. सध्या तर या इंग्लिश नर्सरी ~हाईम्स जागोजागी ऐकायला मिळतात.... अर्थ कळो अथवा नाही..... काय आहे, मराठी शाळाच कमी होतायत ना.....

असो. पण आज मराठी-इंग्लिश वादाचा दिवस नाही आणि हा तसा या पोस्टचा विषयही नाही.....

महाजालात शोधता शोधता १९४१ सालचं एक अप्रतिम रत्न गवसलं आणि तुमच्या बरोबर वाटून घेतल्याशिवाय राहिलं नाही.... काही सेकंदातच मी हे गाणं गुणगुणू लागलो....

'एला फिट्झराल्ड' रॉक्स......


अख्खं गाणं -

A-tisket A-tasket
A brown and yellow basket
I send a letter to my mommy
On the way I dropped it

I dropped it
I dropped it
Yes on the way I dropped it
A little girlie picked it up
And put it in her pocket

She was truckin on down the avenue
Not a single thing to do
She went peck peck pecking all around
When she spied it on the ground

She took it
She took it
My little yellow basket
And if she doesn't bring it back I think that I will die

A-tisket A-tasket
I lost my yellow basket
And if that girl don't return it
I don't know what I'll do

Oh dear I wonder where my basket can be
(So do we, so do we, so do we, so do we, so do we)
Oh geez I wish that little girl I could see
(So do we, so do we, so do we, so do we, so do we)

Oh why was I so careless with that basket of mine?
That itty bitty basket was a joy of mine!

A-tisket
A-tasket
I lost my yellow basket
Won't someone help me find my basket
And make me happy again? again

(Was it green?) No, no, no, no
(Was it red?) No, no, no, no
(Was it blue?) No, no, no, no

Just a little yellow basket
A little yellow basket

आनंद घ्या......

Sunday, October 30, 2011

'ईगल्स' भरारी

१९७० च्या दशकात लॉस एंजलीस मध्ये तयार झालेला, अमेरिकेतील चार्टस मध्ये ५ पहिल्या क्रमांकाची गाणी देणारा, ६ ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स जिंकणारा, ६ पहिल्या क्रमांकाचे अल्बम असणारा म्युझिक ग्रूप म्हणजे 'ईगल्स'.

ग्लेन फ्रे, डॉन हॅनली, बर्नी लीडन आणि रँडी मीस्नर यांच्या या 'ईगल्स'ची गोष्टच जरा वेगळी आहे. मुळात यांच्यातील एकही म्युझीशियन कलिफ़ोर्निअन नाही. हे चौघे १९७१ साली प्रसिद्ध अमेरिकन गायिका 'लिंडा रॉनस्टेट' हिचे टूर-मेम्बर्स म्हणून लॉस एंजलीस, कॅलिफोर्नियाला एकत्र आले. एकत्र काम करता करता त्यांचा एक छान गट बनला. ''लिंडा'ने स्वत:च त्यांना त्यांचा स्वतंत्र म्युझिक ग्रूप बनवण्याचा सल्ला दिला आणि त्यातूनच 'ईगल्स'चा जन्म झाला.

अनेक प्रसिद्ध गाणी देणारा हा ग्रूप सुरुवातीला अमेरिकन कंट्री (लोकसंगीत) सादर करायचा पण पुढे प्रथितयश रॉक ग्रूप म्हणून नावाजला गेला. १९७१ पासून बनलेला हा ग्रूप १९८४ मध्ये फुटला आणि त्यातील प्रत्येकाने आपले स्वतंत्र सांगीतिक करिअर केले. १९९४ साली त्यांचे रीयुनियन होऊन 'ईगल्स' पुन्हा एकदा जोमाने आपलं संगीत सादर करत आहेत. दरम्यान काही सभासद गळले, काही नवे आले. सध्या 'ईगल्स', ग्लेन फ्रे, डॉन हॅनली सह जो वॉल्श आणि टिमूथी श्मीट यांचा ग्रूप आहे.



या अशा 'ईगल्स'चं इथे एक गाणं देतो. मला खात्री आहे की हे सगळ्यांना नक्कीच आवडेल.....

"Hotel California".

त्यावेळचा ग्रूप मेंबर डॉन फेल्डर याचे प्रमुख म्युझिक संयोजन असलेलं हे गाणं डॉन हॅनली, ग्लेन फ्रे आणि स्वत: डॉन फेल्डर यांनी लिहिलेलं आहे. फेल्डर स्वत: गायक नव्हता पण चांगला वादक आणि संगीतकार होता. त्याने तयार केलेल्या संगीताने बाकी जण खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्या संगीतावर गीतलेखनाला सुरुवात केली. त्या काळात कॅलिफोर्निया मध्ये एक वैशिष्ठ्यपूर्ण मतप्रणाली जोरावर होती. कोणतीही कृती ही त्यात किती जास्त सुख आणि किती कमी दु:ख यातच मोजली जायची. या प्रणालीच्या अनेक उपकल्पना होत्या, त्यातलीच एक होती, असं ठिकाण की जिथे जायचे तुम्ही ठरवता पण त्यातून बाहेर पडायची कृती करायचे अधिकार तुम्हाला नाहीत, अशी काहीशी...... या अशाच कल्पनेवर हे गाणं बेतलेलं आहे.

एक भटका प्रवासी 'हॉटेल कॅलिफोर्निया' मध्ये येतो. इथे सगळा झगमगाट आहे, उपभोगाची सर्व साधनं आहेत आणि इथे तुम्ही हवं ते करू शकता पण इथून बाहेर मात्र पडू शकत नाही. एकदा आत आलात की तुम्हाला यातल्या परिस्थितीचे घटक बनूनच राहणं आवश्यक होतं. दुसरे सर्व मार्ग बंद होतात आणि तुमचा तुमच्यावर काहीच कंट्रोल राहत नाही. परिस्थिती प्रवाह-पतितागत होते. ज्योतीवर झेपावणार्‍या पतंगासारखी त्याची अवस्था होते, त्याला कळतंय की यात नाश आहे पण ते थांबवणं त्याला शक्य नसतं. एक प्रकारे त्याच्या स्वत:च्या आयुष्याच्या कल्पना उध्वस्त होतानाच त्याला दिसतात.

(जणू एखादे आजच्या काळासारखे अमेरिकन ड्रीम, तुम्ही स्वेच्छेने अमेरिकेत जाऊ शकता पण तिथून तुम्हाला परतणं कितीही मनात आणलं तरी शक्य होत नाही किंवा मग आपल्या हिंदी सिनेमांमध्ये म्हणतात तसं, "गुनाहोंके दुनियामें आप कदम तो अपनी मर्जीसे रखतें हैं मगर वहाँसे बाहर अपनी मर्जीसे नहीं निकल सकते।".... हे असं आपलं मला एकूण या गाण्याच्या अर्थावरून वाटतंय...)

यातला शेवटचा गिटारवरचा भन्नाट म्युझिक-पीस कोणत्याही वादकाला आपल्याला वाजवता यायलाच हवा अशी महत्त्वाकांक्षा पैदा करणारा आहे. टोटल जबरा......



१९९४ च्या रीयुनियन नंतर झालेल्या एका कार्यक्रमात या गाण्याचं अ‍ॅकॉस्टिक वर्जन ऐकायला मिळतं..... पुन्हा एकदा...... निव्वळ अप्रतिम.......
"Love Will Keep Us Alive"

'ईगल्स'चा विषय चालू आहे तर त्यांची आणखी काही खास गाणी इथे द्यायला कोणतीही हरकत नसावी.
त्यांच्या १९९४च्या रीयुनियनच्या वेळी त्यांचं एक गाणं प्रसिद्ध झालं. जीम कापाल्डी, पौल कार्रेक आणि पीटर वेल यांनी लिहिलेलं, "Love Will Keep Us Alive", हे ते गाणं. मुळात हे पॉलने श्मीट या गिटारिस्टसाठी, ते जेव्हा एकत्र म्युझिक ग्रूप बनवण्याचा विचार करत होते तेव्हा बनवलेलं. पण त्यांचा तो मनसुबा काही प्रत्यक्षात येऊ शकला नाही. पुढे श्मीट ईगल्स ग्रूप मध्ये सहभागी झाल्यावर त्याने हे गाणे ईगल्स रीयुनियन टूर-प्रोग्रामसाठी वापरले. या गाण्याची जातकुळी मूळ ईगल्सच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या प्रेमगीतांसारखीच असल्याने ईगल्सने ते आपल्या नावावर सादर करणं स्वाभाविकच होतं.....

तुम्हालाही आवडेल हे गाणं, त्यातले शब्द आणि ईगल्सचं सुंदर सादरीकरण......


"Take It Easy"

"Take It Easy" हे ईगल्सचं आणखी एक सुंदर गाणं, त्यांची 'सिग्नेचर ट्यून'च!

जॅकसन ब्राउनी आणि ग्लेन फ्रे यांनी लिहिलेलं हे गाणं फ्रे यानेच गायलेलं आहे. 'रॉक एन रोल' लोकप्रिय होण्यामध्ये या सारख्या गाण्यांचा खूप मोठा हातभार आहे.

या गाण्याची पार्श्वभूमी बघा, ब्राउनी ने स्वत:च्या पहिल्या अल्बमसाठी हे गाणं लिहायला सुरुवात केली. पहिलं कडवं लिहून झाल्यावर त्याचा त्यावेळचा शेजारी फ्रे याने ते ऐकलं तर त्याला ते फारच आवडलं. तेव्हा ब्राउनीने हे गाणं फ्रेच्या नव्या ग्रूपसाठी (ईगल्स) देऊन टाकलं. नंतर फ्रे ने याचं दुसरं कडवं लिहीलं आणि ते ईगल्स तर्फे सादर केलं. पुढे ब्राउनीने स्वत:च्या ग्रूप बरोबरही हे गाणं गायलं पण आधी म्हंटल्याप्रमाणे ते ईगल्सचीच सिग्नेचर ट्यून मानलं गेलं....

तेव्हा ही ईगल्स ची सिग्नेचर ट्यून ऐकायलाच हवी. इथे हे गाणं मस्त ऐकू येतं.....


ही गाणी केवळ एक झाँकी आहेत म्हणू. लिहावं तितकं थोडं. ज्याने-त्याने आपली आवड जोपासावी नि वाटावी, यामुळे आपण एकमेकांच्या जीवनात आनंदच वाटणार आहोत, नाही का?

आज इतक्या वर्षांनंतरही जगभरातून अनेक लहान-थोर मंडळींसाठी 'ईगल्स' आणि ईगल्सची गाणी ही मर्मबंधातली ठेव आहे. अनेकदा यांच्याकडून ईगल्सच्या संगीताचा गुणवत्तेच्या कसोटीवर फूटपट्टीसारखा वापर होतो. याला कारणही आहेच -

'इगल्स' रॉक अ‍ॅण्ड रॉल संगीतक्षेत्राच्या आकाशात तीस वर्षांनंतरही तितक्याच ताकदीने भरार्‍या मारत आहे.