Saturday, March 31, 2012

गीतगुंजन - २२ : Hole In My Soul

आज एरोस्मिथच्या आणखी एका मस्त गाण्याचा आस्वाद घेऊ या!

नव्वदीमध्ये अनेक वर्षांनंतर एरोस्मिथ पुन्हा एकदा जुन्या लौकिकाला साजेशी गाणी घेऊन नव्या अल्बमच्या माध्यमातून पुढे आले. या अल्बमचं नाव होतं 'नाईन लाईव्हज'. एरोस्मिथच्या फारच थोड्या गाण्यांमध्ये एखादी थीम अशी सांगितलेली दिसते आणि त्यापैकीच एक गाणं "होल इन माय सोल", या अल्बममध्ये आहे.

हे एका 'नर्ड' मुलाचं गाणं आहे. अत्यंत हुशारीबरोबरच त्याच्यात स्वभावगत चक्रमपणा आहे. त्यामुळे त्याची कोणाशीच मैत्री नसते. मात्र त्यालाही आपली कुणी मैत्रीण असावी असं वाटत असतं. पण कॉलेजात त्याच्या विक्षिप्तपणामुळे कुणीच त्याला भाव देत नाही आणि मुली तर त्याची चिकार टर उडवतात. त्यामुळे आपल्या बुद्धिने तो क्लोनिंगचं यंत्र बनवून आपल्याला हवी तशी मुलगी अनेकदा बनवतो पण इतिहासाची पुनरावृत्ती होते. दरम्यान त्याच्या वर्गातील एक मुलगी याच्यावर जीव टाकत असते जे याच्या ध्यानीही नसतं.

एक चांगल्यापैकी इमोशनल आणि मेलोडिअस गाणं दिलंय एरोस्मिथच्या स्टीव्हन टायलर आणि जो पेरीने डेस्मॉन्ड चाईल्डच्या जोडीने. स्टीव्हनच्या गायनाबद्दल काय म्हणावं? अगदी ५स्टार गायन आहे. एकदम झकास!

नक्की ऐका, त्याबरोबरच इवा मेण्डेज, अलेक्झाण्ड्रा होल्डेन प्रभृतींसाठी बघासुद्धा.....






Hole In My Soul चे लिरिक्स - 


I'm down a one way street
With a one night stand
With a one track mind
Out in no man's land
The punishment sometimes 
Don't seem to fit the crime

Yeah there's a hole in my soul
But one thing I've learned
For every love letter written
There's another one burned
So you tell me how it's gonna be this time

Is it over?
Is it over?
'Cause I'm blowin' out the flame

Take a walk outside your mind
Tell me how it feels to be
The one who turns 
The knife inside of me

Take a look and you will find 
There's nothing there, girl
Yeah I swear, I'm telling you, girl yeah 'cause

(Chorus)
There's a Hole In My Soul 
That's been killing me forever
It's a place where a garden never grows
There's a Hole In My Soul
Yeah, I should have known better
'Cause your love's like a thorn without a rose
Yeah, yeah

I'm as dry as a seven year drought
I got dust for tears
Yeah I'm all tapped out
Sometimes I feel broken and can't get fixed

I know there's been all kinds of shoes 
Underneath your bed
Now I sleep with my boots on 
But you're still in my head
And something tells me this time 
I'm down to my last licks

'Cause if it's over
Then it's over
And it's driving me insane

Take a walk outside your mind
Tell me how it feels to be
The one who turns 
The knife inside of me
Take a look and you will find
There's nothing there, girl, yeah, I swear
I'm telling you girl yeah 'cause 

(Chorus)

Yeah, is it over?
Yeah, it's over
And I'm blowing out the flame

Take a walk outside your mind
Tell me how it feels to be
The one who turns 
The knife inside of me
Take a look and you will find
There's nothing there, girl, yeah, I swear
I'm telling you girl yeah 'cause 

(Chorus)

Oh, oh...

(Good night taj...good night Chelsie!)

Thursday, March 1, 2012

गीतगुंजन - २१ : The Shoop Shoop Song (Its In His Kiss)


गीतगुंजन मालिकेमधलं आजचं गाणं म्हण्टलं तर बर्‍यापैकी जुनं आहे पण तितकंच ताजंही आहे. कारण ते प्रेम-भावनेविषयी आणि ती कशी ओळखता येते या विषयी आहे आहे. रुडी क्लार्क या एकेकाळी पोस्टमनकी करणार्‍या गीतकाराने साठ आणि सत्तरच्या दशकात आर् अ‍ॅण्ड बी नि सोल गायकांसाठी अनेक गाणी लिहिली. त्याने लिहिलेलं एक गाणं बेटी एव्हरेट् नावाच्या गायिकेने १९६४ साली रेकॉर्ड केलं पण तिला ते फारसं आवडलं नाही. का कुणास ठाऊक, पण तिला ते काहीसं बाळबोध वाटलं. आपल्या एका हिट सिंगल रेकॉर्डच्या मागच्या बाजूला तिने ते काहीशा निरुत्साहानेच टाकायला परवानगी दिली. ते गाणं होतं 'Its In His Kiss'. पण झालं काय की रमोना किंग नावाच्या आणखी एका गायिकेने तेच गाणं गायलं आणि तिची रेकॉर्ड वॉर्नर ब्रदर्स त्याच सुमारास प्रकाशित करत होते. म्हणून 'एव्हरेट्'च्या म्युझिक कंपनीने या गाण्याचं नावच बदललं. खरं तर रमोनापेक्षा बेटी प्रसिद्ध आणि प्रस्थापित गायिका होती, तिचंच गाणं जास्त प्रसिद्ध झालं असतं पण गाण्याचं शीर्षक बदललं गेलं खरं, आणि ते बनलं 'The Shoop Shoop Song', गाण्यातल्या शूप् शूप् अशाप्रकारच्या कोरस वरून. बेटी एव्हरेट् ने गायलेलं हे गाणं प्रकाशित होताना असं घडल्यामुळे तेव्हापासून हे 'द शूप शूप साँग' म्हणूनच प्रसिद्ध झालं. गाणं चांगलंच लोकप्रिय झालं. पुढे अनेक गायिकांनी ते गायलं. 

मला व्यक्तिशः हे गाणं खूप आवडतं. तसं बालिश - बाळबोध वगैरेही वाटत नाही. (कदाचित मीच काहीसा बालिश असेन म्हणून ;-)) मला स्वत:ला या गाण्याच्या अनेक कव्हर्सपैकी 'चेर'चं कव्हर जास्त आवडतं. त्या गाण्याच्या 'चेर'च्या गायकीमुळे आणि अर्थात त्याच्या विडिओमुळे. हे गाणं तिच्या 'मर्मेडस्' नावाच्या चित्रपटात घेतलं आहे. या चित्रपटातल्या इतर दोघी अभिनेत्रींनीही या विडिओत सहभाग घेतला आहे आणि त्यामुळेच त्या गाण्याला, गाण्याच्या सादरीकरणाला आणि याच्या विडिओलाही चार चांद लागले आहेत. हे गाणं म्हणते आहे चेर आणि तिला साथ देत आहेत (चित्रपटातल्या तिच्या मुली) विनोना रायडर आणि ख्रिस्तिना रिची. ख्रिस्तिना यात खूपच लहान आहे, गोंडस दिसते. चेर आणि विनोना यांच्याबद्दल काय बोलावं? या दोघींच्या उपस्थितीमुळे पडदा प्रचंड 'प्रेक्षणिय' होतो इतकं वर्णनही मला नेमकं काय म्हणायचंय हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.

तसंही आपल्यापेक्षा अमेरिकेतलं वातावरण बरिक मोकळं असतं. 'मर्मेडस्'च्या या गाण्यात आईच आपल्या मुलींना खरं प्रेम कसं ओळखायचं ते सांगतेय. मुली विचारतायत, ते मुलाच्या डोळ्यात दिसतं का? बोलण्यात दिसतं का? हालचालीत दिसतं का? आणि आई (बहुदा तिच्या अनुभवावरून) ते कसं ओळखायचं ते सांगतेय, 'Its In His Kiss'.

आज 'The Shoop Shoop Song (Its In His Kiss)'चा आनंद घ्या.


'द शूप शूप साँग' असं आहे - (लिरिक्स)

Does he love me I want to know
How can I tell if he loves me so
(Is it in his eyes)
Oh no, you'll be deceived
(Is it in his eyes)
Oh no he'll make believe
If you wanna know if he love you so, it's in his kiss
(That's where it is)

Is it in his face
Oh no, that's just his charm
In his warm embrace
Oh no, that's just his arms
If you wanna know if he loves you so, it's in his kiss

Oh, Oh, Oh, hug him
Squeeze him tight
To find out what you want to know
If it's love, if it really is, it's there in his kiss
Oh, oh, it's in his kiss

How 'bout the way acts
Oh no, that's not the way
You're not listening to all I say
If you wanna know if he loves you so, it's in his kiss
(That's where it is)
Oh , oh, it's in his kiss
(That's where it is)

Oh, Oh, Oh, hug him
Squeeze him tight
To find out what you want to know
If it's love, if it really is, it's there in his kiss

(How 'bout the way he acts)
Oh no, that's not the way
You're not listenin' to all I say
If you wanna know if he loves you so it's in his kiss
(That's where it is)
Oh, Oh, it's in his kiss
(That's where it is)
Oh yeah, it's in his kiss
(That's where it is)
Ooh, it's in his kiss
That's where it is
It's in his kiss
That's where it is
Ooh, it's in his kiss
Ooh, it's in his kiss
Oh, it's in the kiss

छायाचित्रे आंतर जालावरून साभार