Monday, July 16, 2012

एक सुखद फ्युजन

काही गोष्टी अपघाताने घडतात. अशा अपघाताचा परिणाम बघता, ते वेळोवेळी का होत नाहीत याबद्दल खट्टू व्हायला होतं. अर्थात ते पैशापासरी न होणं हेच त्यांचं महत्त्व अधोरेखित करणारं असतं, नाही का?

असे हे उपरोल्लेखित अपघात आपल्या संगीत सृष्टीत ठराविक काळाने पुन्हा पुन्हा घडत असतात आणि त्यामुळे ते आपलं जीवन आणखी सुसह्य करून सोडतात असं आपलं मला वाटतं. असाच एक अपघात १९९२ मध्ये कधीतरी घडला आणि आपलं सांगीतिक विश्व समृद्ध करता झाला.

जाहिरातींच्या जिंगल्सना संगीत देणारा संगीत दिग्दर्शक त्या वेळेला रेकॉर्डिंग रूममध्ये जिंगल्सचे शब्द येण्याची वाट बघत होता. त्याची चाल तयार होती, वेगवेगळ्या वाद्यांची संरचना आवश्यकतेप्रमाणे करून झालेली, वादकांनी आपापल्या जागा धरलेल्या, त्याचा गायक येऊन तयार होऊन रेकॉर्डिंगसाठी उभा होता आणि रेकॉर्डिस्ट्स नि साऊण्ड इंजिनीयर्स त्यांची त्यांची कामं पूर्ण करून रेकॉर्डिंगच्या तयारीत होते, गायकाबरोबर गाण्याची धुन वाजवून रियाजही करून झालेला पण जे गायचंय त्या गाण्याचाच पत्ता नव्हता. जसा तो संगीत दिग्दर्शक नावाजलेला होता तसाच त्याचा गायकही प्रथितयश होता. रेकॉर्डिंग ठरवलेला दिवस नुसताच ढळून जात होता आणि संगीत दिग्दर्शकाचा संयमही. रेकॉर्ड रूम मधून एका अस्वस्थतेत संगीत दिग्दर्शक बाहेर पडला आणि आपल्या वाद्य समूहाकडे जाऊन त्याने गिटार हातात घेतली. त्याला काय सुचलं कुणास ठाऊक, त्याने त्यातून सुरावट वाजवायला सुरूवात केली. वाद्यवृन्दातील वादकांना त्याच्या या अस्वस्थावस्थेतल्या वागण्याची सवयच होती. त्यांनी अहेतुकपणे त्याच्या सुरावटीला साथ देणं सुरू केलं. तो संगीत दिग्दर्शक नि त्याच्या वादकांच्या त्या सुरावटीने उपस्थित गायकाला काही वेगळीच जाणीव झाली आणि नकळतच त्याच्या तोंडून त्या संध्याकाळच्या वेळेचा परिणाम म्हणून म्हणा किंवा इतर काही पण मारव्याचा आलाप निघाला. सुरावट पुढे सरकता सरकता गायकाने निरनिराळ्या पद्धतीने त्यात मारव्याच्या सुरावटी गुंफल्या आणि या सगळ्याची परिणिती एका अत्यंत श्रवणीय फ्युजन संगीतानुभवामध्ये झाली. यामध्ये पौर्वात्य नि पाश्चात्य संगीत प्रकारांचं एक वेगळंच मिश्रण तयार झालं. ते तसं पूर्वीच्या रविशंकर-झाकिर-मॅक्लॉग्लीनच्या प्रसिद्ध 'शक्ती'पेक्षा जरा निराळ्याच प्रकारचं होतं पण होतं फ्युजनच. दोन्ही संगीत प्रकार आपापलं स्वतंत्र अस्तित्त्व राखून खुमारी वाढवत होते.

संगीत रंगात येऊ लागताच रेकॉर्डिस्ट्स ते तुकडे ध्वनिमुद्रित करू लागले. किती तरी वेळ हे जॅम सेशन सुरू होतं, किंबहुना ते, जिंगल्सचे शब्द आल्यावरच थांबलं पण कुणीच कंटाळलेलं नव्हतं. संगीत क्षेत्रातल्या एका अपघाताची नोंद तेव्हा घेतली गेली हे निश्चित.

या सत्य घटनेमधला संगीत दिग्दर्शक होता लेस्ली लुईस उर्फ लेस् आणि गायक होता हरिहरन्. जिंगल्सना संगीत देणारा लेस् पाश्चात्य संगीतातला जाणकार नि स्वतः गायक. हरिहरन् कर्नाटक आणि हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतज्ञ नि आपल्या मखमली आवाजासाठी प्रसिद्ध. वरच्या अपघाताचा परिणाम म्हणून ऑफिशियली १९९६ साली निर्माण झाले, 'कॉलोनियल कझिन्स' आणि त्यांचा याच नावाचा पहिला अल्बम.




लेस् आणि हरिहरन् आपापल्या संगीताशी प्रामाणिक राहून नि एकमेकांवर कुरघोडी न करता जे सादर करतात त्याला खरोखरच तोड नाही असं वाटतं. पुढे त्यांनी आणखी दोन अल्बम्स काढले (द वे वुई डू इट आणि आत्मा) शिवाय दोन तमिळ सिनेमांना संगीतही दिलंय.

त्यांच्या अल्बम्स मधली तीन गाणी त्यांची विस्तृत रेन्ज दर्शवण्यासाठी पुरेशी ठरतील याची खात्री आहे.

आनंद घ्या.
पहिलं, कृष्णा

दुसरं, सा नी ध प

तिसरं, ओ! ओ! काय झालं ( या गाण्यातली इव्हा ग्रोवर काळजाचं पार पाणी पाणी करते राव, नै?) ;-)






Thursday, June 7, 2012

वन हिट वंडर - ५ -> 'Cotton Eye Joe'


पाश्चात्य संगीतामध्ये आणि त्यातही इंग्लिश गाण्यांच्या संदर्भात खूपदा आपली एक गल्लत होते. ज्या लोकांची गाणी चांगल्यापैकी नावाजलेली असतात, ते सगळे मूळात इंग्लिश लोकंच असतात, असं आपलं आपण समजूनच चालतो. माझ्या या समजुतीला पहिला धक्का दिला अ‍ॅबाने, दुसरा बोनी एम् ने. सुरूवातीचे हे दोन धक्के असे काही जोरदार होते की त्यानंतर मी पुन्हा अशी समजुत करूनच घेतली नाही. पण ही तशी खूप जुनी गोष्ट. पाश्चात्य संगीत हे नेहमीच भांडवलदारांच्या हातातून वाढलं आहे. जे विकलं जाईल त्याचीच निर्मिती होते हे तिथलं सर्वमान्य सत्य. पण यामुळेच होतं काय की संगीतक्षेत्रामधले निर्माते, सतत नव्या हरहुन्नरी कलाकारांच्या शोधात असतात. हा शोध यशस्वी व्हावा यासाठीही हे निर्माते फार डोकं लढवतात आणि संगीतक्षेत्रात नव्या नव्या कल्पनांना वाव देतात. १९९४ साली अशीच एक कल्पना तीन स्विडीश संगीत निर्मात्यांनी मांडली.
यान् एरिक्सन, उर्यान युबर्ग आणि पॅट रायनिझ या तीन संगीत निर्मात्यांनी असं ठरवलं की अमेरिकेमधलं कंट्री-म्युझिक (लोकसंगीत) आणि युरोपात प्रचंड लोकप्रिय असलेलं इलेक्ट्रोनिक डान्स म्युझिक (युरोडान्स) यांचं मिश्रण करून शक्य झाल्यास टेक्नोम्युझिक निर्माण करू शकलो तर सध्याच्या नृत्यप्रिय तरुणांमध्ये ते नक्की विकलं जाऊ शकेल. त्यानुसार त्यांनी कंट्री-म्युझिक जाणणार्‍या कलाकारांचा एक गूप बनवला. अमेरिकेमधल्या दक्षिणेकडल्या राज्यातल्या गरीब, अशिक्षित गोर्‍या शेतकर्‍यांमध्ये हे कंट्री-म्युझिकचं मूळ मानलं जातं. त्यांना अमेरिकेत 'Rednecks' असं म्हणतात पण हा शब्द चुकीचा लिहून या ग्रूपचं नामकरण झालं, 'Rednex'.
'Rednex'चं पहिलं गाणं होतं, शतकभरापूर्वीचं मूळ अमेरिकन लोकगीत, 'Cotton Eye Joe'.
'Rednex' ने या मूळ गाण्याचं धृवपद तसंच ठेवलं आणि इतर शब्द मात्र स्वतःचे घातले. मूळातच हे लोकगीत असल्याने लोकही पूर्वीपासूनच आपल्याला हवे तसे शब्द या गाण्यात जोडत होते त्यामुळे ते काही फारसं खटकलं नाही. त्यांनी गाण्याला पूर्वी नसलेली तुफानी लय दिली आणि बरोबरच दिले जोरदार ड्रम-बीट्स. या दोन अ‍ॅडिशन्सनी या लोकगीताला एका जबरदस्त युरोडान्स गाण्यात बदलून टाकलं. हे परिवर्तन इतकं झकास झालं की 'Cotton Eye Joe' युरोपात लोकप्रिय झालंच पण त्याचबरोबर अमेरिकेतही बिलबोर्ड टॉप १०० काऊण्टडाउनमध्ये पहिल्या चाळीसात आलं (२५). त्यांचा विडिओदेखिल खास अमेरिकेतल्या दक्षिणेकडील राज्यातला असावा असाच बनवला गेला होता.
यानंतरही 'Rednex'ची अनेक गाणी युरोपात गाजली पण 'Cottton Eye Joe' इतकी लोकप्रियता अमेरिकेत मात्र त्यांना पुन्हा काही लाभली नाही. यामुळेच आपल्या 'वन हिट वंडर' यादीमध्ये 'Rednex' आणि 'Cotton Eye Joe' या दोघांचा समावेश झालेला आहे.
'Cottton Eye Joe'ने 'Blender' नामक मासिकाच्या '50 Worst Songs Ever' या यादीमध्ये ३८वं तर 'AOL Radio'च्या '100 Worst Songs Ever' या यादीमध्ये ८६वं स्थान राखलं आहे.
व्यक्तिशः मला 'Rednex'चं 'Cotton Eye Joe' त्याच्या विडिओसकट आवडतं हे वेगळं सांगायला नकोच, नाही का? तेव्हा आता या वंडरफूल गाण्याचा आस्वाद घ्याच!

'Rednex'चं 'Cotton Eye Joe' हे गीत - 
If it hadn't been for Cotton-Eye Joe 
I'd been married long time ago 
Where did you come from where did you go 
Where did you come from Cotton-Eye Joe 
If it hadn't been... 

If it hadn't been... 
If it hadn't been... 

He came to town like a midwinter storm 
He rode through the fields so hansome and strong 
His eyes was his tools and his smile was his gun 
But all he had come for was having some fun 

If it hadn't been... 
If it hadn't been... 

He brought disaster wherever he went 
The hearts of the girls was to hell broken sent 
They all ran away so nobody would know 
and left only men cause of Cotton-Eye Joe 

If it hadn't been... 
If it had't been... 

If it hadn't been... 
If it hadn't been... 

If it hadn't been...




Monday, June 4, 2012

वन हिट वंडर - ४ -> 'Mambo no. 5'


मूळ जर्मन असलेल्या लोऊ बेगा या संगीतकार गायकाचं एक गाणं १९९९ साली एकाच वेळी युके, कॅनडा, युएस् आणि ऑस्ट्रेलियात प्रकाशित झालं आणि थोड्याच काळात ते प्रचंड लोकप्रिय झालं. पुढे अनेक देशांच्या लोकप्रिय गाण्यांच्या चार्ट्समध्ये ते अगदी चोटीकी पादान पर जाऊन पोहोचलं. हे गाणं होतं, 'Mambo no. 5'.

डेविड लुबेगा ज्याने आपल्या सांगीतिक कारकिर्दीसाठी लोऊ बेगा हे नाव घेतलेलं, त्याचं मात्र हे संपूर्णपणे स्वतःच गाणं नव्हतं. १९४९ साली पेरेज प्राडो या क्युबन संगीतकार-गायकाने तयार केलेल्या माम्बो संगीत प्रकारातल्या खास नृत्यासाठी बनवलेल्या तुकड्यावर लोऊने हे गाणं बसवलेलं. त्यात त्याने स्वतःचे शब्द टाकले आणि अगदी नव्या ढंगात ते सादर केलं.

संपूर्ण युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलॅण्ड इथे हे गाणं लोकप्रियतेमध्ये पहिल्या क्रमांकावर अनेक आठवडे राहिलं. अमेरिकेतही बिलबोर्ड टॉप १०० मध्ये ३ र्‍या क्रमांकापर्यंत चढलं. लोऊचं आजपर्यंत बिलबोर्ड टॉप १०० मध्ये आलेलं हे एकमेव गाणं. यानंतर त्याचं कुठलंही गाणं इतकं लोकप्रिय होऊ शकलेलं नाही. यामुळेच आपल्या 'वन हिट वंडर' यादीमध्ये पुढचं स्थान लोऊ बेगाच्या 'Mambo No. 5' ला मिळालेलं आहे.

इतकी प्रचंड लोकप्रियता मिळूनही याच गाण्याला 'रोलिंग स्टोन' या लोकप्रिय पाश्चात्य संगीत विषयाला वाहिलेल्या मासिकाच्या '10 Most Annoying Songs' या कौलामध्ये ६ वे स्थान मिळाले. 

बाकीच्यांचं मला माहित नाही पण मला मात्र हे गाणं आवडतं, १९२०-३० सालातल्या, जुन्या क्लब्जमधल्या जॅझ म्युझिशियन्सच्या पार्श्वभूमीवाल्या त्याच्या प्रेक्षणीय विडिओ सकट.


हे असं आहे 'Mambo No. 5' -  


Ladies and gentleman this is Mambo no 5

One, two, three, four, five everybody in the car, so come on
Let's ride to the liquor store around the corner
The boys say they want some gin and juice
But I really don't wanna, beer bust like I had last week
I must stay deep because talk is cheap

I like Angela, Pamela, Sandra and Rita
And as I continue you know they are getting sweeter
So what can I do I really beg you my Lord
To me is flirting it's just like sport, anything fly
It's all good let me dump it please set in the trumpet

A little bit of Monica in my life, a little bit of Erica by my side
A little bit of Rita is all I need, a little bit of Tina is what I see
A little bit of Sandra in the sun, a little bit of Mary all night long
A little bit of Jessica here I am, a little bit of you makes me your man

Mambo no 5

Jump up and down and move it all around
Shake your head to the sound, put your hand on the ground

Take one step left and one step right
One to the front and one to the side
Clap your hand once and clap your hands twice
And if it looks like this then you are doing it right

A little bit of Monica in my life, a little bit of Erica by my side
A little bit of Rita is all I need, a little bit of Tina is what I see
A little bit of Sandra in the sun, a little bit of Mary all night long
A little bit of Jessica here I am, a little bit of you makes me your man

Trumpet, the trumpet
Mambo no 5

A little bit of Monica in my life, a little bit of Erica by my side
A little bit of Rita is all I need, a little bit of Tina is what I see
A little bit of Sandra in the sun, a little bit of Mary all night long
A little bit of Jessica here I am, a little bit of you makes me your man

I do all, to fall in love with a girl like you
You can't run and you can't hide
You and me gonna touch the sky

Mambo no 5