Thursday, October 27, 2016

गीतगुंजन २९: बॅड, बॅड, लिरॉय ब्राऊन

संगीत सृष्टीमध्ये साठच्या दशकाला एक वेगळंच वलय आहे. या काळात रॉक, ब्लूज, सोल, जॅझ, कंट्री असं भावनांच्या उत्स्फूर्त कल्लोळाला कवेत घेणारं संगीत तयार झालं, आणि त्याबरोबरच तयार झाले या संगीताला शब्द देणारे गीतकार. या संगीत प्रकाराला साजेशी गीतं लिहिणं हे खरं तर तसं कसबी काम पण हा काळच असा होता की या काळाला साजेसे गीतकार तर झालेच पण कित्येक संगीतकारांनी आपल्या संगीताला साजेशी गीतरचना करण्यास सुरूवात केली.
त्यापैकीच एक गीतकार संगीतकार गायक होता जीम क्रोस. जीम लहानपणापासून संगीतात रमणारा असला तरी कॉलेजात दाखल होईपर्यंत त्याने आपल्यातल्या संगीतकार-गीतकार आणि गायकाला फारसं मनावर घेतलं नव्हतं. पेनसिल्व्हानिया राज्यातल्या व्हिलानोव्हा विद्यापीठात मानसशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी जीम दाखल झाल्यानंतर तिथे त्याने समानशीलाच्या विद्यार्थ्यांबरोबर ग्रूप बनवून क्लब्स, कॉफी हाऊस अशा ठिकाणी कार्यक्रम करायला सुरूवात केली. लोकांना जे ऐकायचंय ते, म्हणजे सोल, कंट्री, जॅझ काय वाटेल त्या प्रकारातलं संगीत तो ऐकवायचा. त्या दरम्यानच त्याने स्वतः गाणी लिहिण्यास सुरूवात केली.
दरम्यानच्या काळात क्रोस काही काळासाठी सैन्यदलात होता. तिथे त्याला भेटला लिरॉय, अंगाने आडवातिडवा असलेला लिरॉय डोक्याने यथातथाच होता पण मनाने अगदी भोळा होता. जणू जीवनातले छक्केपंजे ठाऊकच नसावेत. त्याला सैन्यातली नोकरी काही मानवली नाही आणि एक दिवस त्याने स्वतःच स्वतःला सुट्टी दिली. तो आपल्या घरी निघून गेला. त्याचा महानपणा असा की महिन्याच्या शेवटी साहेब, आपला, जितके दिवस काम केले तितक्या दिवसाचा पगार घ्यायला पुन्हा कामाच्या जागी आले आणि सैन्याच्या नियमाप्रमाणे त्यांना हातकड्या घालून अटक झाली.
जीमने तेव्हाच ठरवलं की आपल्या या मित्रावर एक गाणं करायचं. ते गाणं म्हणजेच जीमचं, "बॅड, बॅड, लिरॉय ब्राऊन." या लिरॉय ब्राऊनलाही गाण्यात पूर्वी नसलेलं ज्ञान मिळताना जीमने दाखवलंय. गाण्यातली ही गोष्ट फारच मजेशीर आहे. ती समजण्यासाठी आपल्याला हे गाणं ऐकलंच पाहिजे आणि त्याच्या अ‍ॅनिमेटेड विडीओसाठीसुद्धा.
जीमचं हे बिलबोर्ड यूएस काऊन्टडाऊनमधलं पहिलं, क्रमांक एकचं गाणं होतं.

गीत
Well the South side of Chicago
Is the baddest part of town
And if you go down there
You better just beware
Of a man named Leroy Brown
Now Leroy more than trouble
You see he stand 'bout six foot four
All the downtown ladies call him "Treetop Lover"
All the men just call him "Sir"
And it's bad, bad Leroy Brown
The baddest man in the whole damned town
Badder than old King Kong
And meaner than a junkyard dog
Now Leroy he a gambler
And he like his fancy clothes
And he like to wave his diamond rings
In front of everybody's nose
He got a custom Continental
He got an Eldorado too
He got a 32 gun in his pocket for fun
He got a razor in his shoe
And it's bad, bad Leroy Brown
The baddest man in the whole damned town
Badder than old King Kong
And meaner than a junkyard dog
Now Friday 'bout a week ago
Leroy shootin' dice
And at the edge of the bar
Sat a girl named Doris
And oo that girl looked nice
Well he cast his eyes upon her
And the trouble soon began
'Cause Leroy Brown learned a lesson
'Bout messin' with the wife of a jealous man
And it's bad, bad Leroy Brown
The baddest man in the whole damned town
Badder than old King Kong
And meaner than a junkyard dog
Well the two men took to fighting
And when they pulled them off the floor
Leroy looked like a jigsaw puzzle
With a couple of pieces gone

Friday, October 21, 2016

गीतगुंजन - २८ : बिल्ड मी अप, बटरकप.....

वर्ष १९६७ मध्ये तयार झालेला ग्रूप ’द फाऊन्डेशन’ एक वेगळंच रसायन होतं. यामध्ये वेस्ट इंडीज, डॉमेनिका, इंग्लंड इथल्या अनुभवी म्युझिशियन्सचा समावेश होता. सोल, जॅझ, पॉप आणि सायकॅडेलिक अशा निरनिराळ्या संगीत-प्रकारांचं मोटाऊन साऊन्ड म्हणवणारं अजब मिश्रण हे द फाऊन्डेशनचं वैशिष्ट्य. यांच्यात क्लेम कर्टीस मुख्य गायक, माईक इलियट, पॅट बर्क आणि एरिक एलेन्डेल हे तिघे जॅझ संगीतकार अनुक्रमे सॅक्सोफोन आणि ट्रॉबोन वादक होते, टोबी हेज आणि रॉनी स्कॉट ही सोल आणि जॅझ प्रकारातल्या विविध वाद्यांच्या वादनात पारंगत द्वयी त्यांना मदत करत असे. लन वॉर्नर आणि पीटर मॅक्बेथ गिटारवर साथ द्यायचे तर टीम हॅरीस ड्रम्स सांभाळायचा. वर्षभरातच द फाऊन्डेशन ब्रिटनमध्ये लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाले. त्यांचं गाणं ’बेबी, नाऊ दॅट आय हॅव फाऊन्ड यू’, यूके आणि कॅनडामध्ये पहिल्या क्रमांकावर होतं. पण अशा वेळी नव्या ग्रूपमध्ये जे होतं तेच द फाऊन्डेशनच्या बाबतीत घडलं, ग्रूप फुटला.

क्लेम कर्टीसला काही समूहसदस्य फारच कॅज्युअल वागायला लागल्यासारखं वाटू लागलं. आपण एक हिट गाणं दिलंय यामुळे त्यांनी आणखी चांगली गाणी देण्यासाठी मेहनत करणंच सोडलंय असं त्याला वाटू लागलं. तो सोलो करिअर करायला ग्रूपमधून बाहेर पडला. थोड्याच दिवसात माईक इलियटही निघून गेला. हाती पहिल्या क्रमांकाचं हिट गाणं असूनही ’द फाऊन्डेशन’ला त्याचा फायदा होईना. मग कर्टीसने स्वत: जातीने त्याचा रिप्लेसमेन्ट गायक शोधला, कॉलिन यंग.

कॉलिन यंगला आता स्वत:ला सिद्ध करून दाखवायचं होतं की तो कर्टीसची जागा नक्की घेऊ शकतो. त्यासाठी त्याला एखादं हिट गाणं देणं फारच आवश्यक होतं. त्याला तशी संधी लवकरच मिळाली. गीतकार-पियनिस्ट माईक डी’आबो आणि गीतकार टोनी मॅकॉले यांनी लिहिलेलं गाणं, ’बिल्ड मी अप बटरकप’.

सोल, जॅझ आणि बॅक अप गॉस्पेल शैलीतलं हे गाणं कॉलिन भन्नाट गायला. सहगायक आणि सहवादकांनीही त्याला मस्त साथ दिल्याने एक जबरदस्त भट्टी जमली आणि कॉलिन ’द फाऊन्डेश’चा मुख्य गायक म्हणून स्थिरावला. गाणं यूके चार्टमध्ये तिस-या आणि अमेरिकन कॅशबॉक्स चार्ट्मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं.

आनंद घ्या, ’बिल्ड मी अप बटरकप’ गाण्याचा!



१९९८ साली आलेल्या ’देअर इज समथिंग अबाऊट मेरी’ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीदरम्यान या गाण्यावरचा विडीओ दाखवला गेला आणि तोही चित्रपटाइतकाच लोकप्रिय झाला.


गीत

"Build Me Up Buttercup"

Why do you build me up (build me up) Buttercup, baby
Just to let me down (let me down) and mess me around
And then worst of all (worst of all) you never call, baby
When you say you will (say you will) but I love you still
I need you (I need you) more than anyone, darlin'
You know that I have from the start
So build me up (build me up) Buttercup, don't break my heart

"I'll be over at ten", you told me time and again
But you're late, I wait around and then (bah-dah-dah)
I went to the door, I can't take any more
It's not you, you let me down again

(Hey, hey, hey!) Baby, baby, try to find
(Hey, hey, hey!) A little time and I'll make you mine
(Hey, hey, hey!) I'll be home
I'll be beside the phone waiting for you
Ooo-oo-ooo, ooo-oo-ooo

Why do you build me up (build me up) Buttercup, baby
Just to let me down (let me down) and mess me around
And then worst of all (worst of all) you never call, baby
When you say you will (say you will) but I love you still
I need you (I need you) more than anyone, darlin'
You know that I have from the start
So build me up (build me up) Buttercup, don't break my heart

To you I'm a toy, but I could be the boy you adore
If you'd just let me know (bah-dah-dah)
Although you're untrue, I'm attracted to you all the more
Why do I need you so

(Hey, hey, hey!) Baby, baby, try to find
(Hey, hey, hey!) A little time and I'll make you mine
(Hey, hey, hey!) I'll be home
I'll be beside the phone waiting for you
Ooo-oo-ooo, ooo-oo-ooo

Why do you build me up (build me up) Buttercup, baby
Just to let me down (let me down) and mess me around
And then worst of all (worst of all) you never call, baby
When you say you will (say you will) but I love you still
I need you (I need you) more than anyone, darlin'
You know that I have from the start
So build me up (build me up) Buttercup, don't break my heart

I-I-I need you-oo-oo more than anyone, baby
You know that I have from the start
So build me up (build me up) Buttercup, don't break my heart

Thursday, October 6, 2016

गीतगुंजन - २७: बेबी, व्हेन यो'र गॉन....

जगात प्रेमाच्या संदर्भात दोन मतप्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वभाव जुळले पाहिजेत आणि दुसरा अपोझिट अट्रॅक्स. असंच काहीसं मैत्रीच्या बाबतीतही होतं आणि म्हणूनच कधी कधी संभ्रम होतो, ही निखळ मैत्री आहे की प्रेम? स्वभाव जुळले म्हणून किंवा स्वभाव विरुद्ध आहेत म्हणून वादविवादाचे प्रसंग टाळता येत नाहीत. किंबहुना ते तसे येतातच. मग सुरू होतो राग आणि अबोला यांचा सिलसिला! एकान्तात राहवत नाही आणि गर्दी भावत नाही. काऊन्टर करण्यासाठी नेमका विषय टाळून कुणाशी गप्पा, नाटक-सिनेमा-रेडीओ-पुस्तक यामध्ये मन गुंतवण्याचे प्रयत्न सुरू होतात. दिवस कशा ना कशा त-हेने पार पडतो पण मग रात्रं खायला उठते. पुन्हा पुन्हा झालेला वाद, वादाचे मुद्दे, बरोबर, चूक आठवत राहतं आणि सोबत आठवत राहते, वाद घालणारी व्यक्ती. तिचे विचार, मांडण्याची पद्धत, कारणमीमांसा आणि हावभाव. हळूहळू शब्द ऐकू येईनासे होतात, आजूबाजूचा भाग धूसर होऊ लागतो आणि एखाद्या निपुण छायाचित्रकाराने टिपल्यासारखी ती व्यक्ती संपूर्ण मनपटलावर दिसत राहते. प्रश्न मन पोखरत राहतो, हे प्रेम तर नव्हे?

अगदी हीच भावना ब्रायन अ‍ॅडम्स आपल्या 'बेबी, व्हेन यो'र गॉन...' गाण्यात दर्शवतो. खरं तर हे एक युगल गीत आहे पण युगल गीतामधल्या सामान्य रचनेला इथे ब्रायनने पूर्ण फाटा दिलाय. एक कडवं पुरूषाचं आणि एक स्त्रीचं अशी सरळधोपट रचना न करता ब्रायन या गीताला सहगायनाचं रूप देतो. सहगायनाचं हे रूपच गाण्याला वेगळ्या उंचीवर नेतं. गाण्यात व्यक्त झालेली स्थिती मग कुण्या एका पुरूषाची किंवा एका स्त्रीची न होता ती सहभावना होते.

ब्रायनने यात सहगायिका म्हणून स्पाईस गर्ल्समधली स्पोर्टी स्पाईस, मॅलेनी सी निवडली. या निवडीतही ब्रायन बाजी मारून गेलाय. ब्रायनसारखाच हस्की आवाज असणा-या मेल सीचं गायन ब्रायनबरोबर इतकं मिसळून जातं की हे असं झालं नसतं तर गाण्यामागचा सार्वत्रिकत्वाचा भाव इतका परिणामकारकपणे श्रोत्यापर्यंत पोहोचूच शकला नसता.

ब्रायन अ‍ॅडम्स आणि मेल सी यांच्या 'बेबी व्हेन यो'र गॉन' गाण्याचा आनंद घ्या -



Lyrics -

i've been wandering around the house all night
wondering what the hell to do
i'm trying to concentrate but all i can think of is you
well the phone don't ring cuz my friends ain't home
i'm tired of being all alone
got the tv on cuz the radio's playing songs that remind me
of you

baby when you're gone - i realize i'm in love
the days go on and on - and the nights just seem so long
even food don't taste that good - drink ain't doing what it
should
things just feel so wrong - baby when you're gone

i've been driving up and down these streets
trying to find somewhere to go
ya i'm lookin' for a familiar face but there's no one i know

this is torture - this is pain - it feels like i'm gonna go
insane
i hope you're coming back real soon -cuz i don't know what
to do