Thursday, January 12, 2012

गीतगुंजन - १९ : 'Imagine' -> John Lennon



हे गाणं प्रकाशित झालं १९७०-७१ च्या सुमारास, तेव्हा जॉन बीटल्सपासून वेगळा झालेला. त्याचा स्वतःचा एकल सांगीतिक प्रवास सुरू झालेला. त्याची कलाकार पत्नी योको ओनो त्याच्या सोबत होती आणि तिच्या प्रेरणेने जॉन नवी गाणी रचत होता. 

जॉन लेनन आणि योको ओनो
जन्माने जपानी असलेल्या योकोबद्दल जनमानसात बहुतांशी वाईटच बोललं गेलेलं आहे. तीच 'द बीटल्स'च्या फुटण्याला कारणीभूत होती असंच मानलं जातं. बीटल्स आणि जॉनशी संबंधीत असल्याने योकोच्या स्वतःच्या सृजनशीलतेकडे आणि कलेच्या अभिव्यक्तिकडे लोकांचं फारसं लक्ष गेलं नाही ही मात्र वस्तुस्थिती होती. १९६४ साली योकोचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं, त्याचं नाव होतं Grapefruit. या पुस्तकात तिने एखाद्या विशिष्ट विषयबीजाला कलाकृतीचं स्वरूप कसं देता येतं यावर विस्तृत भाष्य केलेलं. यालाच 'कंसेप्च्युअल आर्ट' म्हंटलं गेलं. यात तिने काव्य, चित्रकला अशा अनेक कलांच्या अभिव्यक्तींबद्दल लिहिलं होतं. तिचं लिखाण तेव्हाही काळाच्या पुढचंच होतं कारण तिने जे लिहिलेलं तेच काही वर्षांनंतर कलाविश्वात गोर्‍या युरोपियनांनी अनुसरलं आणि त्याबद्दलचं श्रेय घेतलं. 

असो. पण या पुस्तकात योकोने आपल्या काही कविताही दिलेल्या आहेत. त्यातलीच तिने रचलेली एक तीनोळी होती, The Cloud Piece - 

Imagine the clouds dripping.
Dig a hole in your garden to
put them in.

1963 Spring 



ही तीनोळी जॉनच्या तत्काळ पसंतीला उतरली आणि तिच्यावरून प्रेरणा घेऊन जॉनने 'Imagine' रचलं. काय होतं त्यात? तर त्या गीतातले शब्द एका अशा जगाचं वर्णन करत होते जे जॉनने कल्पलं होतं. कसं होतं त्याच्या मनातलं जग? ते असं होतं - 

Imagine there's no heaven
It's easy if you try
No hell below us
Above us only sky
Imagine all the people living for today

Imagine there's no countries
It isn't hard to do
Nothing to kill or die for
And no religion too
Imagine all the people living life in peace

You, you may say
I'm a dreamer, but I'm not the only one
I hope some day you'll join us
And the world will be as one

Imagine no possessions
I wonder if you can
No need for greed or hunger
A brotherhood of man
Imagine all the people sharing all the world

You, you may say
I'm a dreamer, but I'm not the only one
I hope some day you'll join us
And the world will live as one


आणि ते जॉनने असं सादर केलं - 




Sunday, January 8, 2012

गीतगुंजन - १८ : Raindrops Keep Falling On My Head



आपल्या या ब्लॉगवर अनेक उत्तमोत्तम इंग्लिश गाण्यांची माहिती आपण घेत आहोत, आता यातच आणखी एका अवीट गाण्याची भर पडत आहे.

हॅल डेव्हिड आणि बर्ट बकाराक यांनी १९६९ मध्ये लिहिलेलं आणि बिली जो थॉमस ने गान प्रसिद्ध केलेलं "Raindrops Keep Falling On My Head" हे गाणं त्यावेळच्या "Butch Cassidy and the Sundance Kid" या अप्रतिम चित्रपटात वापरण्यात आलं. या गाण्याला त्या वेळचा सर्वोत्कृष्ट गाण्याबद्दलचा आणि ओरिजिनल संगीताचा 'ऑस्कर' पुरस्कार मिळाला.

मला वाटतं की या गाण्याचं आणि 'Butch Cassidy and the Sundance Kid' चित्रपटाचं एकमेकांशी नक्कीच काहीतरी नातं असावं. नाही तर 'रे स्टेवेन्स'ला त्याच्या चित्रपटासाठी देऊ केलेलं हे गाणं त्याने नाकारलंच नसतं. त्याने ते नाकारलं आणि या चित्रपटाने स्विकारलं. ते म्हणतात ना, रेस्ट इज हिस्ट्री....

पॉल न्यूमन, रॉबर्ट रेडफोर्ड आणि कॅथरीन रॉस अभिनित या नितांत सुंदर चित्रपटात या गाण्याचं 'पिक्चरायझेशन' सुद्धा पॉल न्यूमन आणि कॅथरीन रॉस यांच्यावर फारच छान केलेलं आहे.

या गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. एक, बी. जे. थॉमसचं मूळ सिंगल व्हर्जन आणि 'Butch Cassidy and the Sundance Kid' चित्रपटासाठीचं खास नव्याने ध्वनिमुद्रित झालेलं दुसर. चित्रपटातल्या व्हर्जनमध्ये बी. जे. थॉमसचा आवाज काहीसा जड वाटतो. काही ठिकाणी तो चिरकतोही. या व्हर्जनच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी थॉमसला लॅरिंजायटीसचा त्रास होत असल्यामुळे असं घडलेलं पण ते ही ऐकायला छान वाटतं. पॉल न्यूमन करत असलेल्या सायकलवरील कसरतीसाठी गाण्यात इन्स्ट्रुमेन्टल ब्रेक घेण्यात आलाय पण या ब्रेकमुळे गाण्याची आणि सादरीकरणाची खुमारी अधिकच वाढलीय असं मला वाटतं.


१९७० साली हे गाणं युरोप आणि अमेरिकेतल्या चार्टसमध्ये १ल्या क्रमांकावर पोहोचलं. २००८ साली बिलबॉर्ड हॉट १०० ऑल टाईम टॉप गाण्यांच्या क्रमवारीत हे ८५व्या क्रमांकावरचं प्रसिद्ध गाणं बनलं.

या श्रवणीय गाण्याचा आनंद घेणे वादातीत आवश्यक आहे. प्रेक्षणियतेच्या दृष्टीने 'Butch Cassidy and the Sundance Kid' मधलंच ऐकू या!



हे गीत - 

Raindrops keep fallin' on my head
And just like the guy whose feet are too big for his bed
Nothin' seems to fit
Those raindrops are fallin' on my head, they keep fallin'

So I just did me some talkin' to the sun
And I said I didn't like the way he got things done
Sleepin' on the job
Those raindrops are fallin' on my head, they keep fallin'

But there's one thing I know
The blues they send to meet me won't defeat me
It won't be long till happiness steps up to greet me

Raindrops keep fallin' on my head
But that doesn't mean my eyes will soon be turnin' red
Cryin's not for me
'Cause I'm never gonna stop the rain by complainin'
Because I'm free
Nothin's worryin' me

[trumpet - Instrumental break]

Raindrops keep fallin' on my head
But that doesn't mean my eyes will soon be turnin' red
Cryin's not for me
'Cause I'm never gonna stop the rain by complainin'
Because I'm free
Nothin's worryin' me

छायाचित्रे आंतरजालावरून साभार....

Friday, January 6, 2012

गीतगुंजन - १७ : Daddy Cool -> Boney M


फ्रँक फारीयन
सत्तरीतल्या डिस्को संगीतातील आणखी एक नाव म्हणजे "बोनी एम्".

यांचं एकूण जरा विचित्रच आहे.....

या ग्रूपच्या मूळ मेम्बर्सपैकी 'लिझ मिचेल', 'मॅझी विल्यम्स', 'मार्सिया बेरेट' या तिघी जमैकन आणि लीड मेल व्होकलीस्ट 'बॉबी फारेल' हा अरुबाचा पण हा ग्रूप बनवण्यात आला जर्मनीमध्ये. त्यातही यांचा बोलावता धनी होता 'फ्रांझ रुथर', ज्याला जग 'फ्रँक फारीयन' म्हणून ओळखत होतं, तो जर्मन संगीतकार-गायक.

'फ्रँक'ला 'आर अ‍ॅण्ड बी' संगीतात प्रचंड रस होता. हा संगीत प्रकार प्रामुख्याने कृष्णवर्णीयांमध्ये प्रसिद्ध आहे आणि यातील कलाकारही प्रामुख्याने त्यांच्यातलेच असतात. त्याचं आर अ‍ॅण्ड बी गाणं 'बोनी एम्' नावाने युरोपात गाजू लागलं तेव्हा त्याला असं वाटलं की ही त्याची गाणी आहेत यावर कुणी, तो गौरवर्णीय असल्याने, विश्वासच ठेवणार नाही. मग म्हणून त्याने 'बोनी एम्'चा चेहरा म्हणून 'बॉबी फारेल'ला पुढे केलं आणि स्वत: पडद्यामागे राहून नवी गाणी करू लागला. 'बोनी एम्'च्या गाण्याच्या मूळ अल्बम्समध्ये आणि अनेक टीव्ही कार्यक्रमांत पुरुषी आवाज 'फ्रँक'चाच असायचा पण चेहरा मात्र 'बॉबी'चा असायचा. यांची त्या काळातली गाणी नीट ऐकली आणि पाहिली तर त्याचं लिप-सिंकींग खूपदा लक्षात येतं.

'बोनी एम्'ची अशी वेगळ्या धर्तीची डिस्को गाणी आधी जर्मनीत आणि नंतर संपूर्ण युरोपात खूपच लोकप्रिय झाली. या प्रकारच्या गाण्यांना पुढे 'म्युनिक डिस्को' अशी संज्ञाही मिळाली.

'बोनी एम्'चं Daddy Cool हे एक असंच म्युनिक डिस्को गाणं आहे. 'बोनी एम्'चा चेहरा बॉबी फारेल याचा नाच 'अजब' या एकाच शब्दात व्यक्त करता येईल अशी खात्री आहे.



'बोनी एम्'च्या Daddy Cool या गाण्यामध्ये जी काही मजा आहे ना, ती शब्दामधली नाही तर ती 'फ्रँक'च्या संगीत दिग्दर्शनामध्येच आहे असं मला वाटतं. तरी हे गीत असं आहे -

She's crazy like a fool
What about it daddy cool?

She's crazy like a fool
What about daddy cool?
I'm crazy like a fool
What about daddy cool?

Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool

She's crazy like a fool
What about daddy cool?
I'm crazy like a fool
What about daddy cool?

Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool

She's crazy about her daddy
Oh she believes in him
She loves her daddy

She's crazy like a fool
What about daddy cool?
I'm crazy like a fool
What about daddy cool?

Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool

Sunday, January 1, 2012

बीटलमेनिया - १ -> Norwegian Wood

बीटलमेनिया - १

लिवरपूलच्या क्वॅरी बँक शाळेतला १६ वर्षांचा जॉन लेनन, पंधरा वर्षांचा पॉल मॅकार्टनी आणि १४ वर्षांचा जॉर्ज हॅरिसन १९५७ मध्ये एकत्र आले. त्यांच्याबरोबर जॉनचा आणखी एक मित्र स्टुवर्ट 'स्टु' सॅट्क्लिफदेखिल होता. चौघांनाही गायक-संगीतकार बडी हॉली आवडायचा. त्याचा ग्रूप होता 'द क्रिकेट', मग त्या नावासारखंच नाव म्हणून त्यांनी स्वतःच्या ग्रूपचं नाव 'द बीटल' ठेवलं जे पुढे 'द बीटल्स' असं निश्चित झालं. सुरूवातीला या ग्रूपमध्ये कुणीच ड्रमवादक नव्हता तेव्हा पीट बेस्ट त्यांना साथ द्यायचा पण तो रेग्युलर ड्रम्सवर नसायचा त्यामुळे रिंगो स्टार यांच्यात दाखल झाला आणि बीटल्स एक परिपूर्ण बँड म्हणून क्लब संगीतात लोकांसमोर आले. याच दरम्यान 'स्टु'ने बँड सोडला आणि तो जर्मनीत चित्रकलेच्या पुढच्या शिक्षणासाठी गेला आणि बीटल्स मुख्यतः जॉन, पॉल, जॉर्ज आणि रिंगो यांचा ग्रूप झाला. यात गीतलेखनाची जवाबदारी प्रामुख्याने जॉन आणि पॉलने सांभाळली, जॉन गिटार वाजवायचा नि तो बीटल्सचा म्होरक्या गायक होता, त्याला पॉल आणि जॉर्ज साथ द्यायचे (बॅकिंग व्होकल), ड्रम्सवर रिंगो, बॅस गिटार पॉलची आणि लीड गिटार जॉर्जची अशी विभागणी झाली. पुढे जॉर्जही गीतलेखन करू लागला, गाणी म्हणूही लागला.

वेगवेगळ्या क्लब्ज मध्ये संगीताचे कार्यक्रम करून बीटल्सनी सुरूवात केली. ब्रिटनमधून ते युरोपात विशेषतः जर्मनीमध्ये कार्यक्रम करू लागले. क्लबसंगीतामध्ये ते लोकप्रिय होऊ लागताच इएम्आय रेकॉर्ड्सने त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्या अनेक सिंगल्स बाजारात आणल्या. बीटल्सची लोकप्रियता चिकार वाढू लागली आणि १९६२-६३ सालात तो ब्रिटनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ग्रूप बनला. त्यावेळी आणि त्यानंतर त्यांनी अनेक अप्रतिम गाणी दिली आणि त्यांची लोकप्रियता युके किंवा युरोपपुरती मर्यादित न राहता पार जगभरात पोहोचली. अमेरिका, आशियाच नव्हे तर अगदी आफ्रिकेतही बीटल्सचे चाहते निर्माण झाले. हा सिलसिला ७० सालापर्यंत सुरू होता. या काळातल्या बीटल्सच्या गाण्यांनी लोकांवर प्रचंड गारूड केलेलं की त्यालाच 'बीटलमेनिया' हे नाव मिळालं.

म्हणून २०१२ या नवीन वर्षामध्ये 'द बीटल्स'च्या उत्तमोत्तम गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी सुरू करत असलेल्या या नव्या लेखमालेलाही 'बीटलमेनिया' हेच नाव देत आहे आणि सुरूवात त्यांच्या 'Norwegian Wood' या गाण्याने करत आहे.

बीटलमेनिया - १ -> Norwegian Wood

१९६५ साली आलेल्या बीटल्सच्या 'Rubber Soul' नावाच्या अल्बममध्ये त्यांचं 'Norwegian Wood' हे गाणं आहे. बीटल्सची गीतकार म्हणून दोघांचं नाव देण्याची पद्धत होती. हे गाणं मूळ जॉनने लिहिलेलं असलं तरीही क्रेडिट लेनन-मकार्टनी असं संयुक्त आहे.

हे गाणं तसं वैशिष्ट्यपूर्णच मानलं पाहिजे. यात पहिल्यांदाच गाण्यात जॉनने एक संपूर्ण गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका ठिकाणी तो स्वतःच म्हणतो की ६५ मध्ये आपली पहिली पत्नी सिन्थियाबरोबर स्विट्झर्लंडमध्ये सुट्टीसाठी गेलो असताना मी हे गाणं लिहायला घेतलं. त्या दरम्यान माझं एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण होतं. मी ते सिन्थियाला सांगू शकत नव्हतो मग त्याबद्दल मी या गाण्यात काय घडलं ते लिहिलं. पण नेमकं कोणाबद्दल हे गाणं आहे, ती मुलगी कोण होती हे मला आठवत नसल्याने मी सांगू शकत नाही.

या गाण्याचा सहलेखक पॉल मात्र याबाबत म्हणतो की ते अगदी काल्पनिक गाणं असावं पण जॉन काही तरी रंगवून त्याच्या प्रकरणाबद्दल सांगतो. त्या काळात लोकांकडे सजावटीचं फर्निचर अगदी साध्याशा पाईन लाकडाचं असायचं, त्याला नॉर्वेजियन लाकूड म्हणायचे. मग आम्ही असं नॉर्वेजियन लाकडाचं फर्निचर असलेलं घर कल्पलं. त्या घरात ती मुलगी त्याला घेऊन येते, तिथे त्याला टबमध्ये झोपावं लागतं आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ती घरात नसते तर तो घरात आग लावतो. आम्हाला एकूणच गाणं काहीसं विनोदी करून त्यातही काहीतरी सूड घेतल्याचं दाखवायचं होतं मग आम्ही गीतलेखन असं केलं की वाटावं त्याने घरालाच आग लावलीय.

या काळात पाश्चात्य संगीताच्या दुनियेला भारतीय संगीताची ओळख होत होती. भारतीय संगीताबद्दल युरोपात, विशेषतः ब्रिटनमध्ये खूप जिज्ञासा होती. या जिज्ञासेपोटी बीटल्सचा लीड गिटारिस्ट जॉर्ज हॅरिसन सतारीकडे ओढला गेला होता. या गाण्याचं संगीत बनवताना त्याने अ‍ॅकॉस्टिक गिटारच्या बरोबरीने चाणाक्षपणे सतारीचा प्रयोग केला आणि या गाण्याला एक वेगळेच परिमाण मिळाले. जॉर्ज रवीशंकरांकडे सतार त्यानंतर काही वर्षांनी शिकला पण तेव्हा नुकत्याच विकत घेतलेल्या साध्याशा सतारीवर शोधून शोधून त्याने हवे असलेले सूर काढले आणि या गाण्यात पाश्चात्य संगीतात प्रथमच भारतीय सतार निनादली आणि अगदी चपखल बसली. नंतरही बीटल्सने असे प्रयोग केले आहेत पण रॉक सगीतात सर्वप्रथम सतार याच गाण्यात वाजली.

'Norwegian WooD' गायलंय जॉन लेननने आणि साथ केलीय पॉल मकार्टनीने. अ‍ॅकॉस्टिक गिटार जॉनची तर बॅस गिटार पॉलची आहे आणि सतार जॉर्जने वाजवली आहे. रिंगोने तालवादन केलंय कारण या गाण्यात ड्रम्स नाहीत.

तर 'द बीटल्स'च्या 'Norwegian Wood' चा आनंद घेऊन बीटलमेनिया समजून घेण्याची सुरूवात करूया!


'Norwegian Wood' हे गीत असं आहे -

I once had a girl, or should I say, she once had me...
She showed me her room, isn't it good, norwegian wood?

She asked me to stay and she told me to sit anywhere,
So I looked around and I noticed there wasn't a chair.

I sat on a rug, biding my time, drinking her wine
We talked until two and then she said, "It's time for bed"

She told me she worked in the morning and started to laugh.
I told her I didn't and crawled off to sleep in the bath

And when I awoke, I was alone, this bird had flown
So I lit a fire, isn't it good, Norwegian wood.