Wednesday, April 18, 2012

गीतगुंजन - २४ -> 'Piano Man'

"बिली जोएल", अत्यंत संवेदनशील गीतकार, संगीतकार गायक आणि जबरदस्त पियानीस्ट. हजारो त्याच्या पियानो वादनावर फिदा आहेत नि मला खात्री आहे तुमचंही यावर दुमत नसावं. बिलीची कारकीर्द जवळपास अर्ध्या दशकभराची. त्याने स्वत: एकट्याने लिहिलेली त्याची ३३ गाणी चार्टसमध्ये वरच्या पाय-यांवर स्थापित आहेत. (पहिल्या ४० मध्ये.) त्याला २३ ग्रॅमी नामांकनं आहेत तर त्यापैकी ६ वेळा तो ग्रॅमी जिंकला आहे. त्याची जगभरातली रेकॉर्ड्स-विक्री १५ कोटींच्या वर झालेली आहे. साँग-रायटर्स हॉल ऑफ फेम, रॉक एण्ड रोल हॉल ऑफ फेम इत्यादींमध्ये सामील केला गेलेला बिली, बिल-बोर्ड मासिकाच्या जगातील सर्वोच्च कलाकारांच्या मांदियाळीत २३व्या क्रमांकावर आहे.

 त्याचे स्वत:चे मत तो त्याच्या गाण्यांत नियमितपणे व्यक्त करतो. त्याचे आनंदाचे, दु:खाचे अनुभव तो गाण्यात गुंफतो. त्याचं पाहिलं प्रसिद्ध गाणं होतं, १९७३ सालचं Piano Man. एका गीत-संगीतकाराच्या दृष्टीने आजूबाजूचे जग या गाण्यात फार सुंदर प्रकारे दर्शवले आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की गाण्यात वर्णलेला हा गीत-संगीतकार दुसरा तिसरा कुणी नसून बिली जोएल स्वत:च होता. 

झालं काय होतं, एक कलाकार आपल्या कारकिर्दीत व्यावसायिक म्हणून ज्या चुका करतो त्या चुका बिलीनेही केल्या. फार कमी कलाकारांना स्वत:चा बिझनेस स्वत:च सांभाळता येतो. बिली त्यात कमी पडला. न्यूयॉर्कहून तो लॉस एंजलीसला 'फॅमिली प्रॉडक्शन' नावाच्या रेकॉर्ड लेबल बरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन करून आला. त्याचा या कंपनीबरोबरचा पहिला अल्बम, कंपनीच्या चुकीमुळे, बाजारात पार धुतला गेला. बिलीला 'कोलंबिया रेकॉर्ड्स' या दुस-या कंपनीशी नवा करार करायचा होता पण आधीच्या करारातील जाचक अटींमुळे सर्व अडचणीचं झालेलं. मग बिली काही दिवस 'बिली मार्टिन' या नावाने गुपचूप एल.ए. मधल्या एका बारमध्ये लाउंज पियानिस्ट म्हणून काम करू लागला आणि दरम्यान 'कोलंबिया रेकॉर्ड्स'चे वकील त्याला आधीच्या करारातून सोडवण्याच्या कामाला लागले. 

या बारमध्ये काम करताना आपल्या अवतीभवती पाहिलेल्या लोकांवरून आणि स्वत:च्या त्या वेळच्या अगतिक परीस्थितीमधल्या अनुभवावरून बिलीने गाणं लिहिलं, 'Piano Man'. स्वत:सकट अनेकांमध्ये त्याला फलद्रूप न झालेल्या आकांक्षा त्या काळात दिसल्या. त्यावेळचे त्याच्या आजूबाजूचे बार-टेंडर्स, वेट्रेसेस, बारमध्ये येणारी मंडळी यांचे आणि बिलीचे स्वत:चे अनुभव-इच्छा एकत्र गुंफून त्याने हे अप्रतिम गाणं दिलं आहे. 

संगीतामध्ये मुख्यत: पियानोचा अप्रतिम वापर हे या गाण्याचा विशेष आहे. सुरुवात जॅझ प्रकारच्या पियानो वादनाने होऊन पुढे बिलीने आपल्या सुरेख पियानो आणि हार्मोनिका वादनाने आणि गाण्याच्या मस्त मेलडीने चार चांद लावले आहेत. 


'Piano Man' हे गीत असं आहे - 

It's nine o'clock on a Saturday
the regular crowd shuffles in
There's an old man sitting next to me
Makin' love to his tonic and gin
He says, Son can you play me a memory
I'm not really sure how it goes
But it's sad and it's sweet and I knew it complete
When I wore a younger man's clothes

[Chorus]
La la la de de da
la la de de da da dum
Sing us a song, you're the piano man
sing us a song tonight
Well, we're all in the mood for a melody
And you've got us feelin' alright

Now John at the bar is a friend of mine
He gets me my drinks for free
And he's quick with a joke or to light up your smoke
But there's someplace that he'd rather be
He says Bill, I believe this is killing me
As the smile ran away from his face
Well I'm sure that I could be a movie star
If I could get out of this place

La la la de de da
la la de de da da dum
Now Paul is a real estate novelist
Who never had time for a wife 
And he's talking with Davy who's still in the navy
And probably will be for life

And the waitress is practicing politics
As the businessmen slowly get stoned
Yes, they're sharing a drink they call loneliness
But it's better than drinking alone

Sing us a song, you're the piano man
Sing us a song tonight.
Well, we're all in the mood for a melody
And you've got us feelin' alright.

It's a pretty good crowd for a Saturday,
And the manager gives me a smile
'Cause he knows that it's me they've been coming to see
To forget about life for awhile.
And the piano sounds like a carnival
And the microphone smells like a beer
And they sit at the bar and put bread in my jar
And say "Man, what are you doin' here?"

La la la de de da
la la de de da da dum
Sing us a song, you're the piano man
Sing us a song tonight.
Well, we're all in the mood for a melody
And you've got us feelin' alright.

Tuesday, April 17, 2012

बीटलमेनिया - ३ -> 'Yellow Submarine'

१९६६ साली आपल्या लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या 'बीटल्स' संबंधी सर्वात मोठी 'कॉन्ट्रोव्हर्सी' निर्माण झाली. त्यांचा म्होरक्या जॉन लेनन याने एका मुलाखतीत सहज उद्गार काढले की आज 'बीटल्स' येशू ख्रिस्तापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. त्यानंतर सुमारे आठवडाभर काहीच प्रतिक्रिया नव्हत्या. हेच उद्गार पुन्हा एकदा एका टीन एजर मुलांसाठीच्या डेटबुक नावाच्या मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर छापले आणि अमेरिकाभर गदारोळ सुरु झाला. काही लोकांनी हा जणू ख्रिश्चानिटीवरच हल्ला असल्याप्रमाणे 'बीटल्स' विरोधी सूर आळवणे सुरू केले. जॉनचं म्हणण सरळ होतं की हा माझ्या विधानाचा विपर्यास आहे. हेच जर मी टेलिव्हिजनबद्दल म्हणालो असतो तर कुणालाही त्यात काही वावगं वाटलं नसतं.

याच सुमारास त्यांचं एक गाणं आलं, "Yellow Submarine".

हे गाणं खास 'रिंगो स्टार'साठी तयार केलेलं होतं. त्यावेळी 'पॉल' आणि 'जॉन', लहान मुलांसाठी एखाद गाणं करण्यावर विचार करत होते आणि ते त्यांना 'रिंगो'साठी बनवायचं होतं. 'रिंगो' च्या आवाजाचा विचार करून त्यांनी हे गायकी ढंगात बनवायचं टाळलं. एक म्हातारा दर्यावर्दी आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना त्याच्या प्रवासाच्या, साहसाच्या कथा सांगतोय अशी थीम घेऊन हे गाणं बनवलंय. या गाण्यात 'बीटल्स'नी अनेक प्रयोग केलेत. बॅकग्राउंडचे विविध आवाज त्याचेच द्योतक आहेत.

हे गाणं इंग्लंड मध्ये १ल्या क्रमांकावर १३ आठवडे राहिलं. पण ख्रिश्च्यानिटीविरोधी रिमार्क्समुळे अमेरिकेत ते कधीच १ल्या क्रमांकावर येऊ शकलं नाही.

'रिंगो'च्या खास गायनाच्या ष्टाईलसाठी हे गाणं जरूर ऐका......


'Yellow Submarine' हे गीत - 

In the town where I was born
Lived a man who sailed to sea
And he told us of his life
In the land of submarines

So we sailed on to the sun
Till we found a sea of green
And we lived beneath the waves
In our yellow submarine

We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine
We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine

And our friends are all aboard
Many more of them live next door
And the band begins to play

We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine
We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine

{Full speed ahead Mr. Boatswain, full speed ahead
Full speed ahead it is, Sgt.
Cut the cable, drop the cable
Aye, aye, Sir, aye, aye
Captain, captain}

As we live a life of ease
Every one of us has all we need
(One of us, has all we need)
Sky of blue and sea of green
(Sky of blue, sea of green)
In our yellow submarine
(In our yellow, submarine, aha)

We all live in a yellow submarine
A yellow submarine, yellow submarine
We all live in a yellow submarine
A yellow submarine, yellow submarine

We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine
We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine

 

Saturday, April 14, 2012

गीतगुंजन - २३ -> 'November Rain'

हे आणखी एक एक्यॅण्णव मधलं गाणं. 'गन्स एन रोझेस' बॅण्ड आवडायचा. त्यावेळी त्यांची गाणी खूप गाजलेली होती. त्यातही त्यांचं 'नोव्हेंबर रेन' जास्त आवडायचं. सुरुवातीचा अ‍ॅक्सेल रोझचा पियानो ऐकून वाटायचच नाही की आपण कोणतं तरी हार्ड रॉक गाणं ऐकतोय पण पुढे जसं जसं ऐकावं तसं तसं मॅट सोरमचे ड्रम्स बीट्स आणि स्लॅशची गिटार अंगात भिनायला लागली. यातले स्लॅशचे दोन्ही गिटार सोलोज भन्नाट आहेत.

हे गाणं ऐकून जितकं आवडायचं त्यापेक्षा जास्त ते बघून आवडायला लागलं. कदाचित तेव्हाच्या पंधरा लाख डॉलर्सचं बजेट असणारा व्हिडिओ, इलेक्ट्रिक गिटारिस्ट 'स्लॅश'चा तो हेलिकॉप्टरमधून घेतलेला जबरदस्त शॉट आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे बराच वेळ बघायला मिळणारी स्टेफनी सीमॉर यांचा तो एकत्रित परीणाम असावा.

'नोव्हेंबर रेन' लिहिलंय स्वत: 'अ‍ॅक्सेल रोझ'ने आणि त्याबरोबरच या गाण्याचं संगीत आणि संगीत संयोजन दोन्हीही त्याचंच आहे. 'गन्स एन रोझेस'च्या इतर गाण्यांच्या तुलनेत हे त्यांचं सर्वाधिक लांबी असलेलं गाणं आहेच आणि त्याबरोबरच बिलबोर्ड चार्टसमध्येही पहिल्या दहांमध्ये आलेलं आहे (क्रमांक - ३).

हे गाणं ऐकताना एखादी गोष्ट दृश्यरूपात बघतोय आणि त्याच वेळेला संगीताच्या हिंदोळ्यांवर झुलत असल्यासारखं मला वाटतं, बहुतेक गाण्यात मध्ये मध्ये होणारा टेम्पोमधला बदल आणि गाण्याचा विडिओ याला कारणीभूत असावा, पण हे ही खरं की त्यातही एक आनंदच मिळतो.

तेव्हा एकदा नीट ऐका आणि पहा 'गन्स एन रोझेस'चं November Rain.


' November Rain' गीत असं आहे -

When I look into your eyes
I can see a love restrained
But darlin' when I hold you
Don't you know I feel the same

'Cause nothin' lasts forever
And we both know hearts can change
And it's hard to hold a candle
In the cold November rain

We've been through this such a long long time
Just tryin' to kill the pain

But lovers always come and lovers always go
An no one's really sure who's lettin' go today
Walking away

If we could take the time
To lay it on the line
I could rest my head
Just knowin' that you were mine
All mine
So if you want to love me
Then darlin' don't refrain
Or I'll just end up walkin'
In the cold November rain

Do you need some time...on your own
Do you need some time...all alone
Everybody needs some time...
On their own
Don't you know you need some time...all alone

I know it's hard to keep an open heart
When even friends seem out to harm you
But if you could heal a broken heart
Wouldn't time be out to charm you

Sometimes I need some time...on my
Own
Sometimes I need some time...all alone
Everybody needs some time...
On their own
Don't you know you need some time...all alone

And when your fears subside
And shadows still remain
I know that you can love me
When there's no one left to blame
So never mind the darkness
We still can find a way
'Cause nothin' lasts forever
Even cold November rain

Don't ya think that you need somebody
Don't ya think that you need someone
Everybody needs somebody
You're not the only one
You're not the only one

Friday, April 13, 2012

बीटलमेनिया - २ -> 'Yesterday'

'बीटल्स'च्या इतर गाण्याशी तुलना करता त्यांचं एक गाणं हे खरंच त्यांचच आहे का असा विचार येतो, ते म्हणजे 'Yesterday'. या गाण्याचं क्रेडीट 'पॉल मेकार्टनी' आणि 'जॉन लेनन' या दोघांना दिलेलं दिसलं तरी हे गाणं फक्त 'पॉल'चंच आहे. गीत, संगीत आणि गायन सबकुछ 'पॉल मेकार्टनी".


हे ऐकताना बीटल्सचं ट्रेड मार्क गाणं न वाटल्यानेच अनेक वर्ष याचा अंतर्भाव बीटल्सच्या अल्बम्स मध्ये केला जात नव्हता. पण अमेरिकेत 'सिंगल' म्हणून प्रकाशित झाल्यावर थोड्याच काळात चार्टसमध्ये पहिल्या नंबर वर ते जाऊन पोहोचलं. त्यानंतरच ते इंग्लंडमध्ये प्रकाशित होऊ शकलं. 

असं सांगतात की 'पॉल'ने याची धून झोपेत किंवा स्वप्नात बनवली. अनेक दिवस त्याला वाटत होतं की ही चाल त्याने दुस~या कुणाची ऐकली आहे. संगीत-चोरीचा आळ येऊ नये म्हणून त्याने अनेक ठिकाणी ही धून वाजवून ती कुणाची नाहीये ना याची खात्री करून घेतली नि त्यानंतरच त्यानुसार शब्द रचना करून गाणं बनवलं. गाणं 'पॉल'चंच असूनही ते बीटल्सचंच म्हणून मानलं गेलं कारण त्यावेळेस त्यांना गाण्याची सामायिक क्रेडिट्स द्यायची होती.

१९६५ सालच्या या गाण्यात 'पॉल'चा क्लास लगेच समजतोय, नाही?


'Yesterday' चे लिरिक्स - 

Yesterday, all my troubles seemed so far away
Now it looks as though they're here to stay
Oh, I believe in yesterday.

Suddenly, I'm not half to man I used to be,
There's a shadow hanging over me.
Oh, yesterday came suddenly.

Why she had to go I don't know she wouldn't say.
I said something wrong, now I long for yesterday.

Yesterday, love was such an easy game to play.
Now I need a place to hide away.
Oh, I believe in yesterday.

Why she had to go I don't know she wouldn't say.
I said something wrong, now I long for yesterday.

Tuesday, April 3, 2012

फोटोशॉप कलाकारी

मायकल अर्थात एम.जे. माझा एक आवडता कलाकार.

नुकतेच फेणे गुर्जींच्या कृपेने फोटोशॉप कलाकारी ऑनलाईन शिकायचा प्रयत्न करतोय. गुर्जीन्चा गृहपाठ मी जसा केला तसा खाली चिकटवतोय. लगेच त्यांना दाखवेन म्हणतो. बघू कोणती श्रेणी देतात ते.....