Tuesday, December 20, 2011

गीतगुंजन - १२

गीतगुंजन - १२ : "Something"

१९६९ साली बीटल्स आपला 'अ‍ॅबे रोड' हा अल्बम बनवत होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच मन लावून जॉर्ज हॅरिसनच्या एका गाण्यावर काम करायला सुरुवात केली. पॉल आणि जॉन दोघांच्याही मते जॉर्जचं ते सर्वात चांगलं गाणं होतं. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन या दोहोंच्या अनुषंगाने! त्यांच्या या पूर्वीच्या 'लेट इट बी' अल्बमच्या ध्वनिमुद्रणादरम्यान जॉर्ज एकटाच बाजूच्या एका रिकाम्या स्टुडीओमध्ये गेला आणि त्याने या गीताचे बोल लिहिले. या गाण्याचं संगीत तयार होईपर्यंत 'लेट इट बी' अल्बम तयार झालेला. मग हे गाणं बीटल्सच्या पुढच्या 'अ‍ॅबे रोड' मध्ये घेतलं गेलं. बीटल्सचा सदस्य असताना अमेरीकन बिलबोर्ड चार्ट्मध्ये पहिल्या क्रमांकावर गेलेलं जॉर्जचं हे पहिलंच गाणं.

या गाण्यात जॉर्ज मुख्य गायक आहे आणि त्याला पॉलने साथ केलीय. लीड गिटारवर स्वतः जॉर्ज तर बेस गिटारवर पॉल आहे. ड्रम्सवर रिंगो आहे. जॉनचा पियानो सुरुवातीला आणि मध्ये ऐकता येतो. पण गाण्यात झकास रंग भरतो काळा बीटल अर्थात बिली प्रेस्टन आणि त्याचा ऑर्गन! त्याबरोबरच जॉर्ज मार्टीनची तन्तुवाद्यांची अरेन्जमेण्ट गाण्याला एका वेगळ्याच पातळीवर नेते.

या गाण्याबरोबर प्रदर्शित झालेला विडिओही स्पेशल आहे. यात जॉर्ज (पॅटी), पॉल (लिण्डा), जॉन (योको) आणि रिंगो (मॉरीन) आपापल्या पत्नींसोबत दिसतात. (अर्थात याच दरम्यान बीटल्सच्या सदस्यांमध्ये वाद सुरू असल्याने प्रत्येकाचं वेगवेगळं चित्रिकरण करून एकत्र जोडलं आहे.)

जॉर्जच्या या गाण्याची सर्वाधिक कव्हर व्हर्जन्स गायली गेलेली आहेत. एल्व्हीस प्रीस्ले, फ्रँक सिनात्रा, शर्ली बॅसी, जेम्स ब्राऊन, एरिक क्लॅप्टन अशा अनेक धुरंधरांची यामध्ये गणना होते. फ्रँक सिनात्रा या गाण्याची "आत्तापर्यंत लिहिलेलं सर्वोत्तम प्रेमगीत" अशी स्तुती करतो.

राग, द्वेष आणि मत्सराने वेढलेल्या आजच्या काळात या अस्सल प्रेमगीताचा आनंद घ्या.....


तर हे असं आहे आजपर्यंतचं सर्वोत्तम प्रेमगीत - "Something"

Something in the way she moves,
Attracts me like no other lover.
Something in the way she woos me.
I don't want to leave her now,
You know I believe and how.

Somewhere in her smile she knows,
That I don't need no other lover.
Something in her style that shows me.
I don't want to leave her now,
You know I believe and how.

You're asking me will my love grow,
I don't know, I don't know.
Stick around, and it may show,
But I don't know, I don't know.

Something in the way she knows,
And all I have to do is think of her.
Something in the things she shows me.
I don't want to leave her now.
You know I believe and how.

No comments:

Post a Comment