Thursday, June 7, 2012

वन हिट वंडर - ५ -> 'Cotton Eye Joe'


पाश्चात्य संगीतामध्ये आणि त्यातही इंग्लिश गाण्यांच्या संदर्भात खूपदा आपली एक गल्लत होते. ज्या लोकांची गाणी चांगल्यापैकी नावाजलेली असतात, ते सगळे मूळात इंग्लिश लोकंच असतात, असं आपलं आपण समजूनच चालतो. माझ्या या समजुतीला पहिला धक्का दिला अ‍ॅबाने, दुसरा बोनी एम् ने. सुरूवातीचे हे दोन धक्के असे काही जोरदार होते की त्यानंतर मी पुन्हा अशी समजुत करूनच घेतली नाही. पण ही तशी खूप जुनी गोष्ट. पाश्चात्य संगीत हे नेहमीच भांडवलदारांच्या हातातून वाढलं आहे. जे विकलं जाईल त्याचीच निर्मिती होते हे तिथलं सर्वमान्य सत्य. पण यामुळेच होतं काय की संगीतक्षेत्रामधले निर्माते, सतत नव्या हरहुन्नरी कलाकारांच्या शोधात असतात. हा शोध यशस्वी व्हावा यासाठीही हे निर्माते फार डोकं लढवतात आणि संगीतक्षेत्रात नव्या नव्या कल्पनांना वाव देतात. १९९४ साली अशीच एक कल्पना तीन स्विडीश संगीत निर्मात्यांनी मांडली.
यान् एरिक्सन, उर्यान युबर्ग आणि पॅट रायनिझ या तीन संगीत निर्मात्यांनी असं ठरवलं की अमेरिकेमधलं कंट्री-म्युझिक (लोकसंगीत) आणि युरोपात प्रचंड लोकप्रिय असलेलं इलेक्ट्रोनिक डान्स म्युझिक (युरोडान्स) यांचं मिश्रण करून शक्य झाल्यास टेक्नोम्युझिक निर्माण करू शकलो तर सध्याच्या नृत्यप्रिय तरुणांमध्ये ते नक्की विकलं जाऊ शकेल. त्यानुसार त्यांनी कंट्री-म्युझिक जाणणार्‍या कलाकारांचा एक गूप बनवला. अमेरिकेमधल्या दक्षिणेकडल्या राज्यातल्या गरीब, अशिक्षित गोर्‍या शेतकर्‍यांमध्ये हे कंट्री-म्युझिकचं मूळ मानलं जातं. त्यांना अमेरिकेत 'Rednecks' असं म्हणतात पण हा शब्द चुकीचा लिहून या ग्रूपचं नामकरण झालं, 'Rednex'.
'Rednex'चं पहिलं गाणं होतं, शतकभरापूर्वीचं मूळ अमेरिकन लोकगीत, 'Cotton Eye Joe'.
'Rednex' ने या मूळ गाण्याचं धृवपद तसंच ठेवलं आणि इतर शब्द मात्र स्वतःचे घातले. मूळातच हे लोकगीत असल्याने लोकही पूर्वीपासूनच आपल्याला हवे तसे शब्द या गाण्यात जोडत होते त्यामुळे ते काही फारसं खटकलं नाही. त्यांनी गाण्याला पूर्वी नसलेली तुफानी लय दिली आणि बरोबरच दिले जोरदार ड्रम-बीट्स. या दोन अ‍ॅडिशन्सनी या लोकगीताला एका जबरदस्त युरोडान्स गाण्यात बदलून टाकलं. हे परिवर्तन इतकं झकास झालं की 'Cotton Eye Joe' युरोपात लोकप्रिय झालंच पण त्याचबरोबर अमेरिकेतही बिलबोर्ड टॉप १०० काऊण्टडाउनमध्ये पहिल्या चाळीसात आलं (२५). त्यांचा विडिओदेखिल खास अमेरिकेतल्या दक्षिणेकडील राज्यातला असावा असाच बनवला गेला होता.
यानंतरही 'Rednex'ची अनेक गाणी युरोपात गाजली पण 'Cottton Eye Joe' इतकी लोकप्रियता अमेरिकेत मात्र त्यांना पुन्हा काही लाभली नाही. यामुळेच आपल्या 'वन हिट वंडर' यादीमध्ये 'Rednex' आणि 'Cotton Eye Joe' या दोघांचा समावेश झालेला आहे.
'Cottton Eye Joe'ने 'Blender' नामक मासिकाच्या '50 Worst Songs Ever' या यादीमध्ये ३८वं तर 'AOL Radio'च्या '100 Worst Songs Ever' या यादीमध्ये ८६वं स्थान राखलं आहे.
व्यक्तिशः मला 'Rednex'चं 'Cotton Eye Joe' त्याच्या विडिओसकट आवडतं हे वेगळं सांगायला नकोच, नाही का? तेव्हा आता या वंडरफूल गाण्याचा आस्वाद घ्याच!

'Rednex'चं 'Cotton Eye Joe' हे गीत - 
If it hadn't been for Cotton-Eye Joe 
I'd been married long time ago 
Where did you come from where did you go 
Where did you come from Cotton-Eye Joe 
If it hadn't been... 

If it hadn't been... 
If it hadn't been... 

He came to town like a midwinter storm 
He rode through the fields so hansome and strong 
His eyes was his tools and his smile was his gun 
But all he had come for was having some fun 

If it hadn't been... 
If it hadn't been... 

He brought disaster wherever he went 
The hearts of the girls was to hell broken sent 
They all ran away so nobody would know 
and left only men cause of Cotton-Eye Joe 

If it hadn't been... 
If it had't been... 

If it hadn't been... 
If it hadn't been... 

If it hadn't been...




No comments:

Post a Comment